शांताराम शिवराम सावरकर
Appearance
(बाळाराव सावरकर या पानावरून पुनर्निर्देशित)
शांताराम शिवराम सावरकर ऊर्फ बाळाराव सावरकर (? - नोव्हेंबर २०, इ.स. १९९७) हे मराठी राजकारणी, अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष होते.
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकरांच्या ’मला काय त्याचे’ (१९७३) या कादंबरीची प्रस्तावना बाळाराव सावरकर यांनी लिहिली आहे. ते ’वीर सावरकर आणि गांधीजी’ या लेखसंग्रहाचे संकलक होते.
गांधीहत्येनंतर दिल्लीत तुरुंगात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा निषेध करण्यासाठी मुंबईतील सावरकर-सदनावर संतप्त जमाव चालून आला होता तेव्हा बाळाराव सावरकर, भास्कर शिंदे आणि तेंडुलकर यांनी केवळ लाठीच्या साहाय्याने जमावाला तोंड दिले. मात्र या हल्ल्यात स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधु डॉ. नारायणराव हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच पुढे १९ ऑक्टोबर, १९४९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
बाळाराव सावरकरांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- क्रांतिघोष (संपादित)
- गोमांतक
- जोसेफ मॅझिनी (संपादन)
- तेजोगोल
- भाषणे राजकीय
- भाषाशुद्धी
- महायोगी वीर सावरकर
- योगी योद्धा विदासा
- रानफुले
- विलक्षण जपानी (दि इन्क्रेडिबल जॅपनीज या पुस्तकाचा अनुवाद)
- वीर सावरकर आणि गांधीजी (लेखसंग्रह-संकलन)
- सावरकर चरित्र
- स्वातंत्र्यवीर सावरकर (चरित्र, खंड १ ते ४)
- स्वातंत्र्यवीर सावरकर : अखंड हिदुस्थान लढा पर्व १३७३
- स्वातंत्र्यवीर सावरकर : अखंड हिंदुस्थान लढा पर्व (सन १९४१ ते १९४७)
- स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन
- स्वातंत्र्यवीर सावरकर : सांगता पर्व
- स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदुमहासभापर्व (भाग १)
- हिंदुराष्ट्र - पूर्वी, आता, पुढे
- हिंदुसमाजसंरक्षक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर