बापू विष्णू गवस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बापू गवस हे एक गोमंतकीय स्वतंत्र सैनिक होते. त्यांच्या वडिलांचं नाव विष्णू गवस होत. पेडणे तालुक्यातील चांदेल या गावाचे ते रहिवासी होते.[१] बापू गवस यांनी मराठी आणि पोर्तुगीज भाषेत शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन १९५४ साली आजाद गोमंतक दल या संघटनेचा ते भाग बनले होते. बापू गवस नेमबाजीत माहिर होते. त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध लढ्यामध्ये सहभाग घेतला होता. २६ नोव्हेंबर १९५५ च्या चांदेल पोलीस ठाण्याच्या हल्ल्यात ते सहभागी झाले होते.[२] पोर्तुगीज सैन्यांनी १५ जानेवारी १९५६ रोजी बापू गवस व त्याच्या अन्य साथीदारांना जीपचा विस्फोट करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात बापू गवस व त्यांचे साथीदार गोमंतक भूमीसाठी शहीद झाले. त्यांच्या या आहुतीची आठवण म्हणून चांदेल येथे बापू गवसांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच चांदेल येथे त्यांच्या स्मरणार्थ शाळेला "हुतात्मा बापू गवस" हे नाव देण्यात आले आहे.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Shirodkar,, DR.P.P (1986). Who's Who Of Freedom Fighters. Vol. I. The executive editor and memeber secretary, Goa Gazetteer department of Goa,Daman and Diu Panaji.CS1 maint: extra punctuation (link)
  2. ^ रानडे, मोहन (१९६९). सतीचे वाण. विमल पब्लिकेशन.
  3. ^ सरदेसाई, मनोहर (१९९७). स्वातंत्र्यपथावर. गोमंतक मराठी अकादमी.