बाणकोट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बाणकोटचा किल्ला

बाणकोट महाराष्ट्रातील किल्ला आहे. हा किल्ला सावित्री नदीच्या मुखावर आहे.

बाणकोट खाडीमार्गे पूर्वी व्यापार चालत असे. ह्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी नदीच्या मुखावर हा किल्ला बांधण्यात आला. बाणकोट किल्ल्यापासुन ३५ कि.मी. अंतरावर असलेला मंडणगड किल्ला आणि द़ासगावची लेणी आजही या जुन्या व्यापारी मार्गाची साक्ष देत उभी आहेत. अनेक राजवटी पाहिलेला बाणकोटचा किल्ला हिम्मतगड आणि फोर्ट व्हिक्टोरीया या नावांनीही ओळखला जातो.

इतिहास[संपादन]

बाणकोटच्या किल्ल्याचा सर्वात जूना उल्लेख ग्रीक प्रवासी प्लिनी ह्याने इसवी सनाच्या पहिल्या शतकात मंदारगिरी किंवा मंदगोर या नावाने केला आहे. त्यानंतर इ.स. १५४८ पर्यंतचा या किल्ल्याचा इतिहास उपलब्ध नाही. १५४८ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला. नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी हा गड काबिज करून त्यास हिम्मतगड असे नाव दिले.