Jump to content

बांगलादेश टेलिव्हिजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बांग्लादेश टेलिव्हिजन या पानावरून पुनर्निर्देशित)

बांग्लादेश टेलिव्हिजन ( बांग्ला: বাংলাদেশ টেলিভিশন ,मराठी: बांग्लादेश टेलिव्हिजन ), सामान्यतः BTV ( बांग्ला: বিটিভি ,मराठी:बिटिव्ही) असे ओळखले जाते ), हे बांगलादेशचे सरकारी मालकीचे दूरदर्शन नेटवर्क आहे. नेटवर्कची स्थापना १९६४ मध्ये PTV ची पूर्व पाकिस्तान शाखा म्हणून झाली. हे जगातील सर्वात जुने बंगाली-भाषेतील टेलिव्हिजन नेटवर्क आहे, [] ज्यात BTV सोबत आकाशवाणी बांगलादेश बेतार समावेश होतो, हे दोन्ही उपक्रम सरकारच्या मालकी असून आणि त्यांच्याच द्वारे संचालित केले जाते.[] []

बांग्लादेश टेलिव्हिजन हे देशाचे एकमेव टेलिव्हिजन नेटवर्क आहे जे टेरेस्ट्रियल टेलिव्हिजन प्रसारण पद्धतीने प्रसारीत केले जाते. [] सदर केंद्रे प्रामुख्याने दूरदर्शन परवान्यातुन मिळणाऱ्या महसुलाद्वारे चालवली जातात. [] या वाहिनीने अनेक पुरस्कार विजेते कार्यक्रम तयार केले असले तरी, ते सरकारच्या बाजुने झुकतमाप आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या गुणवत्तेत अभाव असल्याचा आरोप अनेकदा केला गेला आहे. [] बांगलादेश टेलिव्हिजनचे मुख्यालय आणि प्रशासकीय इमारती दोन्ही ढाका येथील रामपुरा येथे आहेत. []

१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापूर्वी, बांग्लादेश टेलिव्हिजन हे बांग्लादेशमध्ये प्रदान केलेले एकमेव दूरदर्शन प्रसारक होते आणि अनेक उपग्रह दूरचित्रवाणी चॅनेल सुरू होईपर्यंत ते प्रेक्षकवर्गाच्या दष्टी एक अतिशय यशस्वी नेटवर्क होते, याच कारणामुळे नेटवर्कने चढउतार आणि काही काळ स्थिरता अनुभवली , बहुतेक त्यासाठी वस्तुस्थिती कारणीभूत असावी ती म्हणजे बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून सरकारी प्रचारासाठी सदर माध्यमाचा केला जाणारा वापर होय.[] []

हे BTV ढाका आणि BTV चितगाव ही दोन मुख्य दूरदर्शन केंद्रे आणि BTV World या उपग्रह दूरचित्रवाहिनीसह संपूर्ण बांगलादेशात चौदा सहक्षेपीत केंद्रे चालवते. हे आशिया-पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन आणि एशियाव्हिजनचे सदस्य आहे आणि युरोपियन ब्रॉडकास्टिंग युनियनचे सहयोगी सदस्य आहे. [१०] [११] बांगलादेश टेलिव्हिजनने आणखी सहा दूरचित्रवाणी वाहिन्या सुरू करण्याची योजना आखली आहे. []

BTV ही वाहिनी संपूर्ण आशिया तसेच युरोप आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये उपग्रहाद्वारे पाहिली जाऊ शकते. संसदीय दूरदर्शन वाहिनीचे ह्या प्रसारण देखील बांग्लादेश टेलिव्हिजन नेटवर्क द्वारे केले जाते. बीटीव्ही ढाकाच्या मानाने वेगळ्या वेळापत्रकासह बीटीव्ही वर्ल्डचे स्वतंत्र मनोरंजन टेलिव्हिजन वाहिनी मध्ये रूपांतर केले जाणार आहे. [१२] बीटीव्ही ढाका टेरेस्ट्रियल टेलिव्हिजनवर दिवसाचे अठरा तास आणि सॅटेलाइट टेलिव्हिजनवर दिवसाचे २४ तास प्रसारण करते. त्याचे सॅटेलाइट फीड त्याच्या स्थलीय प्रसारणाच्या ऑफ-एर तासांमध्ये BTV वर्ल्डचे प्रसारण सहक्षेपीत करते. बीटीव्ही चितगाव दररोज पूर्ण दिवसभर प्रसारण करते.

इतिहास

[संपादन]

१९६४-१९७१: पाकिस्तान टेलिव्हिजन युग

[संपादन]
पीटीव्हीच्या ढाका स्टुडिओमध्ये मुस्तफा मोनवर ; १९६४

बीटीव्हीने २५ डिसेंबर १९६४ रोजी संध्या. ०७:०० वाजता ( ढाका मानक वेळ ) प्रथम प्रसारण सुरू केले, पायलट टेलिव्हिजन ढाका या नावाने तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून, [१३] "ओई जे आकाश निल होलो आकाश" नावाचे गाणे प्रसारित केले., गायिका फरदौसी रहमान यांनी गायले आहे. [१४] NEC द्वारे प्रदान केलेल्या प्रसारण उपकरणांसह हे DIT भवनातून चार तासांच्या आधारावर प्रसारित होते. [१५] तीन महिन्यांच्या प्रसारणानंतर, ते अधिकृतपणे पाकिस्तान टेलिव्हिजनच्या सेवेत रूपांतरित झाले. [१३]

  1. ^ a b বিটিভির আরও ৬টি চ্যানেল চালু হচ্ছে: তথ্যমন্ত্রী. Bangla Tribune (Bengali भाषेत). 26 December 2021. 2022-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 July 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Autonomy of BB and BTV". The Daily Star. 7 August 2011. 9 November 2021 रोजी पाहिले.
  3. ^ বিটিভি-বেতারে পুরোটাই 'সরকার'. Prothom Alo (Bengali भाषेत). 29 December 2018. 11 June 2022 रोजी पाहिले.
  4. ^ "Television of Bangladesh". Bangladesh.com. 22 December 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2008 रोजी पाहिले.
  5. ^ Shaw, Rajib; Kakuchi, Suvendrini; Yamaji, Miki (2021). Media and Disaster Risk Reduction: Advances, Challenges and Potentials. Springer Nature. p. 21. ISBN 9789811602856. 31 July 2022 रोजी पाहिले.
  6. ^ "Media men slam ministry for poor BTV standards". The Daily Star. 22 July 2004. 24 June 2011 रोजी पाहिले – UCLA International Institute द्वारे.
  7. ^ "Offices of BTV". Bangladesh Television. 17 November 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "The Daily Star Web Edition Vol. 5 Num 240". The Daily Star. 27 January 2005. 2022-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 December 2021 रोजी पाहिले.
  9. ^ Chowdhury, Parvez (1 December 2011). "Television in Bangladesh". The Daily Star. 12 June 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "Bangladesh Television (BTV)". Asia-Pacific Broadcasting Union. 21 November 2021 रोजी पाहिले.
  11. ^ "BTV At a Glance". Bangladesh Television. 2023-05-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 November 2021 रोजी पाहिले.
  12. ^ Ahsan, Sohel (3 January 2022). পূর্ণাঙ্গ বিনোদন চ্যানেল হচ্ছে বিটিভি ওয়ার্ল্ড. Jugantor (Bengali भाषेत). 4 January 2022 रोजी पाहिले.
  13. ^ a b Roy, Ratan Kumar (28 December 2020). Television in Bangladesh: News and Audiences. Taylor & Francis. p. 36. ISBN 978-1000332742. 5 July 2022 रोजी पाहिले.
  14. ^ বিটিভির প্রতিযোগিতার সক্ষমতা বাড়াতে হবে: প্রধানমন্ত্রী. BDNews24 (Bengali भाषेत). 25 December 2014. 2022-09-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 June 2022 रोजी पाहिले.
  15. ^ Sagor, Faridur Reza (26 July 2014). "The First Days of Television". The Daily Star. 19 November 2021 रोजी पाहिले.