Jump to content

बहाडा ढोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
White Stork

बुज्या , भुज्या , मोठा धोकरू , पांढरा करढोक , करढोक , पांढरा बलाक ,पांढरा बुजा , श्वेतबलाक अशी अनेक नावे असलेला पक्षी म्हणजे बहाडा ढोक होय. इंग्रजी मध्ये याला white stork असे म्हणतात.

ओळखण

[संपादन]
या पक्ष्याचा आकार मध्यम - हंसाएवढा तर उंची अंदाजे ३ ते ३ १/२ फुट ,बगळ्यासारखा दिसणारा लांब मानेचा पक्षी . स्वच्छ पांढरा , फक्त पंख काळे , व त्याचे पाय लांब असतात . बहाडा या पक्षाची चोच लाल , तांबडी , मोठी व अणकुचीदार असते .हे पक्षी एकटे , जोडीने किंवा समूहाने राहतात .

वितरण

[संपादन]
पाकिस्तान , उत्तर भारत , नेपाळ , तराई आणि थोड्याशा प्रमाणात पुर्वस बंगला देश , आसाम तसेच दक्षिणेकडे महाराष्ट्र , कर्नाटक आणि तामिळनाडू या भागांत हिवाळ्यात दिसतात . 

निवासस्थाने

[संपादन]

हे पक्षी दलदली व भातशेतीत आढळतात .

संदर्भ

[संपादन]
  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
White Stork (Ciconia ciconia) (4)