बदक पालन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बदक

बदक पालन हा पाळलेल्या बदकांची अंडी, मांस व पिसे विकण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय भारतात पूर्वेकडील राज्यात त्याचप्रमाणे तामीलनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुट पालनास पोषक असे हवामान नाही, तेथे हा व्यवसाय केला जातो. छोट्या प्रमाणातील व्यवसायांमध्ये बदकांची संख्या ८ ते १० असून ती मोकाट सोडलेली असतात. ती वर्षाकाठी ६० ते ७० अंडी देतात. या व्यवसायात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला गेल्यास उत्पन्न वाढते.

बदक पालन व्यवसाय हा बदकांच्या अंड्यांसाठी व मांसासाठी केला जातो. बदकाच्या अंड्यांना भारतात विशेष मागणी नाही, याचे प्रमुख कारण हे कमी प्रमाणातील उत्पादन आहे. उपलब्ध अंडी किंवा पक्षी प्रामुख्याने हॉटेलमध्ये वापरली जातात. बदकांच्या अंड्यांना एक प्रकाराचा उग्र वास असल्याकारणानेही त्यांची मागणी कमी असते.

-
विवरण कोंबडी बदक
अंड्याचे सरासरी वजन (ग्रॅम) ५० ७०
अंड्यातील पाण्याचे प्रमाण (ग्रॅम) ७४.५७ ७०.८३
ऊर्जा (कॅलरीज) १५८ १८५
प्रथिने (ग्रॅम) १२.१४ १२.८१
स्निग्ध पदार्थ (ग्रॅम) १५.१५ १३.७७
पिष्टमय पदार्थ (ग्रॅम) १.२० १.४५
खनिज पदार्थ ०.९४ १.१४

बदकाच्या जाती[संपादन]

बदकांच्या जातींचे वर्गीकरण तीन गटांत केले जाते.

  • भरपूर मांस देणारी बदके : यांमध्ये प्रामुख्याने आयलेसबरी, पेकिन यांचा समावेश आहे. या शिवाय राऊन्स, मसतोव्होस किंवा व्हाईट इंडियन रनर्स हेसुद्धा मांसाकरिता वापरतात.
  • भरपूर अंडी देणारी बदके : यांत प्रामुख्याने खाकी कॅम्पबेल, मॅगपाईज काळे किंवा निळे ऑरपिंगटस आणि व्हाईट स्टनब्रिज इत्यादीचा समावेश होतो. यासर्व जातीत खाकी कॅम्पबेल ही जात अत्यंत विकसित झाली असून, या जातीची बदके वर्षासाठी २५० ते ३०० अंडी देतात.
  • शोभेची बदके : यांत प्रामुख्याने टील, व्हिडजन, पीनटेल,पॉकहार्ड, करोलिना आणि शोव्हेलिअर या जातींचा समावेश होतो . ही बदके अत्यंत शोभिवंत असून, त्यांचे रंग सोनेरी, लाल, जांभळा, निळा, पांढरा, पिवळा इत्यादी रंगांच्या विविध छटायुक्त असतात.

संदर्भ[संपादन]