Jump to content

फ्रोझन (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रोझन
चित्रपटाचा लोगो
दिग्दर्शन

ख्रिस बक

जेनिफर ली
निर्मिती पीटर डेल वेचो
कथा

ख्रिस बक जेनिफर ली

शेन मॉरिस
पटकथा जेनिफर ली
संकलन जेफ ड्रेहेम
संगीत

क्रिस्टोफ बेक (स्कोअर) रॉबर्ट लोपेझ (गाणी)

क्रिस्टन अँडरसन-लोपेझ (गाणी)
देश अमेरिका
भाषा इंग्रजी
प्रदर्शित २०१३
वितरक वॉल्ट डिस्ने मोशन पिक्चर्स
निर्मिती खर्च $150 दशलक्ष
एकूण उत्पन्न $1.280 अब्जफ्रोझन हा एक संगणक-अ‍ॅनिमेटेड संगीत कल्पनारम्य चित्रपट आहे.[१] वॉल्ट डिझ्नी अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित हा चित्रपट वॉल्ट डिझनी पिक्चर्सने २०१३ मध्ये प्रदर्शित केला. हा ५३वा डिझ्नी अ‍ॅनिमेटेड फीचर चित्रपट असून हान्स ख्रिश्चन अँडरसनच्या "द स्नो क्वीन" या परीकथेवरून हा चित्रपट प्रेरित आहे.

या चित्रपटात एका राजकुमारीचे चित्रण केले आहे जी आईसमन व त्याचा एक रेनडियर आणि स्नोमॅन सोबत तिच्या बहिणीला शोधण्यासाठी प्रवासाला निघते. त्या राजकुमारीच्या बर्फाळ जादूई शक्तींनी अनवधानाने त्यांचे राज्य अनंतकाळच्या हिवाळ्यात अडकवलेले असते.

फ्रोझनने ८६ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार आणि इतर अनेक महत्त्वाचे पुरस्कार जिंकले आहेत. चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिस कमाईत $1.280 अब्ज कमाई करून, एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक यश मिळवले. टॉय स्टोरी 3ला मागे टाकत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट बनला आणि 2019 मध्‍ये द लायन किंग मागे टाकेपर्यंत त्याचे स्थान कायम राखले. हा आतापर्यंतचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा आणि 2013 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. जानेवारी 2015 पर्यंत, हा चित्रपट युनायटेड स्टेट्समध्‍ये सर्वाधिक विकली जाणारी ब्लू-रे डिस्क बनली.

चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर 2015 मध्ये अ‍ॅनिमेटेड लघुपट, 2017 मध्ये अ‍ॅनिमेटेड फीचर आणि २०१९ मध्ये फीचर-लांबीचा चित्रपटाचा दुसरा भाग, फ्रोझन II तयार केला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Resort, Disneyland. "Disneyland Resort Debuts 'World of Color -- Winter Dreams,' a Merry New Spectacular for 2013 Holiday Season". www.prnewswire.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.