फ्रोझन (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्रोझन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
फ्रोझन
Frozen Logo Black.svg
चित्रपटाचा लोगो
दिग्दर्शन

ख्रिस बक

जेनिफर ली
निर्मिती पीटर डेल वेचो
कथा

ख्रिस बक जेनिफर ली

शेन मॉरिस
पटकथा जेनिफर ली
संकलन जेफ ड्रेहेम
संगीत

क्रिस्टोफ बेक (स्कोअर) रॉबर्ट लोपेझ (गाणी)

क्रिस्टन अँडरसन-लोपेझ (गाणी)
देश अमेरिका
भाषा इंग्रजी
प्रदर्शित २०१३
वितरक वॉल्ट डिस्ने मोशन पिक्चर्स
निर्मिती खर्च $150 दशलक्ष
एकूण उत्पन्न $1.280 अब्ज



फ्रोझन (२०१३) (इंग्रजी: Frozen) हा वॉल्ट डिस्ने अ‍ॅनिमेशन स्टुडिओद्वारे निर्मित आणि वॉल्ट डिझनी पिक्चर्सने रिलीज केलेला अमेरिकन संगणक-अ‍ॅनिमेटेड संगीतमय कल्पनारम्य चित्रपट आहे.[१] हा ५३वा डिस्ने अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म असून हान्स ख्रिश्चन अँडरसनच्या परीकथा "द स्नो क्वीन" वरून प्रेरित आहे.

या चित्रपटात एका राजकुमारीचे चित्रण केले आहे जी आईसमन, त्याचे रेनडियर आणि स्नोमॅन सोबत तिच्या बहिणीला शोधण्यासाठी प्रवासाला निघते. त्या बहिणीच्या बर्फाळ जादूई शक्तींनी अनवधानाने त्यांचे राज्य अनंतकाळच्या हिवाळ्यात अडकवलेले असते.

फ्रोझनने 86 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार जिंकले. तसेच इतर अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळवले. त्याच्या थिएटर रन दरम्यान, चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिस कमाईत $1.280 अब्ज कमाई करून, एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक यश मिळवले. टॉय स्टोरी 3ला मागे टाकत आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा अ‍ॅनिमेटेड चित्रपट बनला आणि 2019 मध्‍ये द लायन किंग मागे टाकेपर्यंत त्याचे स्थान कायम राखले. हा आतापर्यंतचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा आणि 2013 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. जानेवारी 2015 पर्यंत, हा चित्रपट युनायटेड स्टेट्समध्‍ये सर्वाधिक विकली जाणारी ब्लू-रे डिस्क बनली.

चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर 2015 मध्ये अ‍ॅनिमेटेड लघुपट, 2017 मध्ये अ‍ॅनिमेटेड फीचर आणि २०१९ मध्ये फीचर-लांबीचा चित्रपटाचा दुसरा भाग, फ्रोझन II तयार केला.

कथा[संपादन]

प्रदर्शन[संपादन]

प्रतिसाद[संपादन]

लिगसी (महत्त्व आणि वारसा)[संपादन]

दुसरा भाग[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Resort, Disneyland. "Disneyland Resort Debuts 'World of Color -- Winter Dreams,' a Merry New Spectacular for 2013 Holiday Season". www.prnewswire.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी पाहिले.