फ्रिट्झ (बुद्धिबळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रिट्झ हा फ्रान्स मोर्श व मॅथ्यास फीस्त यांनी विकसित केलेला व चेसबेसने प्रकाशित केलेला जर्मन बुद्धिबळ प्रोग्राम आहे. याची बहुप्रक्रियनासाठी डीप फ्रिट्झ नामक आवृत्ती आहे.

या सॉफ्टवेअरच्या सर्वात नवीनतम आवृत्त्या डीप फ्रिट्झ १२ व फ्रिट्झ १२ या आहेत. जगातील अनेक नवखे हौशी खेळाडू तसेच अनेक नामवंत खेळाडू देखील फ्रिट्झचा वापर करतात. बुद्धिबळ खेळावरील प्रभुत्व वाढविण्यासाठी तसेच खेळाचे अनेक पैलू वरील सरावासाठी देखील या प्रोग्रामचा वापर होतो.