Jump to content

फ्रांसिस बेकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रांसिस बेकन
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वKingdom of England संपादन
स्थानिक भाषेतील नावFrancis Bacon संपादन
दिलेले नावFrancis संपादन
आडनावBacon संपादन
उत्कृष्ट पदवीviscount संपादन
जन्म तारीख२२ जानेवारी 1561 संपादन
जन्मस्थानYork House, Strand, लंडन संपादन
मृत्यू तारीख९ एप्रिल 1626 संपादन
मृत्यूस्थानHighgate, लंडन संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणन्युमोनिया संपादन
चिरविश्रांतीस्थानSt Michael's Church, St Albans संपादन
वडीलNicholas Bacon संपादन
आईAnne Bacon संपादन
वैवाहिक जोडीदारAlice Barnham संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषालॅटिन भाषा, इंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, University of Poitiers संपादन
चे शिष्यJohn Whitgift, Jean Hotman, Marquis de Villers-St-Paul संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1576 संपादन
कार्य कालावधी (अंत)1626 संपादन
धर्मAnglicanism संपादन
Contributed to creative workPopular Science संपादन
List of worksFrancis Bacon bibliography संपादन
उल्लेखनीय कार्यNew Atlantis, inductive reasoning संपादन
Archives atArchitekturmuseum der Technischen Universität München संपादन
Has works in the collectionNational Gallery, Tate, Art Institute of Chicago, Museum of Modern Art, Tehran Museum of Contemporary Art संपादन
चळवळअनुभववाद संपादन
सदस्यताग्रेज इन संपादन
पुरस्कारKnight Bachelor संपादन
Depicted byFrancis Bacon, 1st Viscount St Alban, Francis Bacon, Sir Francis Bacon, 1st Viscount St Albans (1561-1626) संपादन
Interested inतत्त्वज्ञान संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन
फ्रांसिस बेकन

इंग्लिश लेखक फ्रांसिस बेकन (१५६१ - १६२६) हे सर निकोलस बेकन यांचे आठवे अपत्य. सर निकोलस इंग्लंडची महाराणी एलिझाबेथचे ऑर्डर्ली होते. त्यामुळे सर्व कुटुंबियांचे थेट राजघराण्याशी संबंध होते. फ्रांसीस बेकन लहानपणापासून अतिशय हुशार होते. ते केंब्रीजच्या ट्रिनीटीचे विद्यार्थी पदवी संपादन केल्यानंतर १५७६ मध्ये त्यांनी कायद्याच्या पदवीसाठी ग्रेज इन येथे प्रवेश घेतला. पण वडिलांच्या अकाली निधनामुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. बेकन यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि ते बॅरिस्टर झाले. राजघराण्याशी जवळचे संबंध असल्याने बेकन यशाच्या पायऱ्या फार वेगाने चढत गेले. आधी ते Utter Barrister [मराठी शब्द सुचवा](१५८२) झाले, पुढे Bencher [मराठी शब्द सुचवा](१५८६), मग Reader [मराठी शब्द सुचवा](१५८८) आणि Double Reader (१६००) व्हायला त्यांना जास्त वेळ लागला नाही. दरम्यान १५८४ साली ते खासदार झाले. राजघराण्याशी असलेली जवळीक अजून वाढली. त्या आधारावरच बेकन यांनी थेट महाराणीला उपदेश देणे सुरू केले. हे मात्र अनेकांना रुचले नाही. बेकन यांना आपल्या पदावरून पाय उतार व्हावे लागले.

पुढील राजे जेम्स प्रथम यांनी मात्र बेकन यांना आधी Soliciter General (१६०७) म्हणून नेमले, नंतर Attorney General (१६१३), पुढे बेकन यांची Lord Chancelleor[मराठी शब्द सुचवा] म्हणून नियुक्ती झाली (१६१८) तर Viscount[मराठी शब्द सुचवा] of St. Albans (१६२१) म्हणून ते रुजू झाले. आपल्या कार्यालयीन कामाचा मोबदला म्हणून त्यांनी लोकांकडून लाच स्वीकारली असल्याचे त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आल्याने १६२१ साली उच्च न्यायालयाने बेकन यांना (१) ४०,००० पाऊण्डचा दंड, (२) राजांच्या मनात येईल तेवढ्या दिवसांची कैद, (३) इंग्लंडच्या राजांची सत्ता जेथे कुठे असेल त्या सर्व ठिकाणी, आयुष्यभर कोण्त्याही सरकारी पदावर पुन्हा नियुक्ती न होणे, (४) लोक सभागृह आणि न्यायाल्याच्या परिसरात जन्मभर पाय न ठेवणे अशी शिक्षा ठोठावली.