फोर्ट डोनेलसन
Appearance
फोर्ट डोनेलसन हा अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील तटबंदीवजा किल्ला आहे. हा किल्ला अमेरिकन यादवी युद्धादरम्यान कॉन्फेडरेसीने बांधला होता. कंबरलॅंड नदीकाठी असलेल्या या किल्ल्याला दक्षिणेच्या सेनापती डॅनियेल एस. डोनेलसनचे नाव देण्यात आले होते.
१८६२मध्ये उत्तरेच्या सैन्याने युलिसिस एस. ग्रॅंटच्या नेतृत्वाखाली हा किल्ला काबीज केला व युद्ध संपेपर्यंत सोडला नाही. हा उत्तरेसाठी टेनेसीमधील मोठा व्यूहात्मक विजय होता.