Jump to content

फॅनी हेस्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फॅनी हेस्स: विज्ञानाची एक विसरलेली सेवा या पानावरून पुनर्निर्देशित)

फॅनी हेस्स यांचा जन्म १८५० मध्ये न्युयार्क मध्ये झाला. ती एका यशस्वी डच व्यापारीची  मुलगी, १८७४ मध्ये तिचा विवाह वाल्थर हेस्स याच्यासोबत झाला आणि फॅनी पतीसोबत  ड्रेस्डेनला राहू लागली. सदरील काळात वाल्थर हेस्स, ‘बॅक्टेरियोलॉजीचा जनक’ रॉबर्ट कोचच्या बर्लिन प्रयोगशाळांमध्ये अभ्यास करण्यासाठी कार्यरत होता. घरातील सर्व कामे व मुलांचा अभ्यास सांभाळून फॅनी वाल्थरची सहाय्यक तंत्रज्ञ झाली. जीवाणू वाढू शकतील असे वातावरण तयार करणे (सामान्यत: बीफ मटनाचा रस्सा ज्याला ग्रोथ मीडिया म्हणून ओळखले जाते), उपकरणाची साफसफाई करणे. तसेच पतीच्या संशोधनाच्या  प्रकाशनांसाठी सुंदर जल रंगाची चित्रे तयार करण्यासाठी तिच्या कलात्मक कलागुणांचा वापर करून पतीची संशोधन कार्यात मदत करणे हे फॅनीचे नित्त्याचे  काम होते .

वायुजनित सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यासाठी वाल्थर फॅनीने बनवलेल्या वाढीच्या माध्यमासह लेपण दिलेल्या नळ्या वापरत होते. पण दुर्दैवाने, या माध्यमामधील जिलेटिन ३७ डिग्री सेल्सियस तापमानात वितळले गेले, जे उबदार दिवसात घन ते द्रवपदार्थात रूपांतरित झाले. त्याचप्रमाणे काही जीवाणूं विकारांच्या मदतीने जिलेटिनचे द्रवीकरण करीत होते.या मुद्द्यांमुळे त्यांचे प्रयोग अडचणीत आले आणि ते निराशेचे कारण होते.आत्ता गरज होती ती जीवाणूच्या वाढीसाठी प्रभावी असे घन पृष्ठभाग असलेले पोषण जीवाणूंना उपलब्ध करून देण्याची. त्यावेळी फॅनी हेस्स यांनी अगार वापरण्याची सूचना केली आणि ही जीवाणुशास्त्रातील अभूतपर्व उत्क्रांती ठरली . अगदी महान लुई पाश्चर यांनीही उद्गार काढले, “दॅंट्स अन् ग्रॅंड प्रोग्रॉस!”

फॅनीने जिलेटिनच्या ऐवजी समुद्री शैवाल पासून बनवलेला अर्क,अगार वापरण्याचे सुचविले. ती बऱ्याच वर्षांपासून फळ आणि भाजीपाला जेली तयार करण्यासाठी अगार वापरत होती, ही  अगार वापराविषयी कला ती आपल्या  आई आणि इंडोनेशियाच्या जावा येथे राहणाऱ्या मित्रांकडून शिकली होती.

अगारने वाल्थर आणि रॉबर्ट कोच यांच्या समस्यांचे निराकरण केले. अगार  ४०अंश सेल्सियस पर्यंत घनरूप, पारदर्शक, सूक्ष्मजीवांद्वारे विघटीत न होणारा आणि निर्जंतुकीकरण करणे शक्य होईल असा , जीवाणू वाढण्यास आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी हे योग्य पर्याय ठरला.

1908 मध्ये तिच्या पतीच्या शेवटच्या प्रकाशनासाठी, ‘टायफॉइडच्या रूग्णांच्या आतड्यांसंबंधी जीवाणूंचे संवर्धन, फॅनीने टायफॉइडच्या जीवाणूंच्या आगार प्लेट वरील कॉलोनीच्या वेगवेगळ्या वाढीच्या टप्प्यातील सूक्ष्म व अत्यंत अचूक जल रंगाची प्रतिमा काढल्यात ज्यामुळे केवळ जीवाणूशास्त्र आणि सूक्ष्मदर्शी या दोन्ही गोष्टींचा पूर्ण आकलन होत होते. वाल्थरच्या बऱ्याच कागदपत्रांमध्ये फॅनीचे योगदान असूनही तिला लेखक म्हणून कधीच समाविष्ट केले गेले नाही किंवा त्याच्या कार्यात कबूल केले नाही ही शोकांतिका.

१९३४ मध्ये जेव्हा फॅनीचा मृत्यू झाला तेव्हा काही जीवाणूशास्त्रज्ञांना तिच्या मृत्यूची माहिती होती. फॅन्नीच्या जीवनावरील त्यांच्या १९३९ च्या पेपरमध्ये, "विज्ञान आणि मानवतेची विसरलेली सेवा" हे मान्य करण्यासाठी "साधा अगर" याला "मिसेस हेस्सचे माध्यम" (Frau Hesse’स medium)म्हणून संबोधले जावे अशी हेंच आणि लेकिंड यांनी सुचविली. हे अद्याप घडलेले आहे, परंतु अद्याप काहीही उशीर झालेला नाही आता तरी आपण “साधा अगार"(plain agar) याला "मिसेस हेस्सचे माध्यम" (Frau Hesse’s medium)म्हणून संबोधून फॅनी हेस्स यांना सन्मान नक्कीच देवू शकतो.