फिलिप दुसरा, मॅसेडोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महान सेनानी फिलीप दुसरा

फिलिप (इ.स.पू. ३८२ - इ.स.पू. ३३६) (राज्यकाळ इ.स.पू. ३६० - मृत्यूपर्यंत) मॅसेडोनियाचा राजा आणि अलेक्झांडर द ग्रेटचा (सिकंदराचा) पिता होता.

फिलिप हा प्राचीन कालीन मॅसेडोनिया देशाचा राजा सेनानी होता. ग्रीसमध्ये तत्कालीन अस्तित्वात असलेल्या अनेक लहान शहरांच्या देशांना(नगरराज्यांना) त्याने जिंकून एकछत्री अंमल प्रस्थापीत केला. आजवरचा सर्वात सेनानी अलेक्झांडर हा फिलिपचा मुलगा होता. अलेक्झांडरने जरी जग जिंकायची मोहीम पार पाडली असली तरी जग जिंकायची कल्पना फिलिपचीच होती तसेच त्या दृष्टीने प्रबळ सैन्याची तयारी फिलिपनेच केली होती.[ संदर्भ हवा ]

एका युद्धात फिलिपने आपला डोळा गमावला होता. एका समारंभात झालेल्या त्याच्यावर हल्लेखोराने त्याच्या पाठीत सुरा भोकसून फिलिपचा वध केला. हल्लेखोर तात्काळ मारला गेला. फिलिपच्या वध हा अलेक्झांडरच्या आईने करवला असल्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या शक्यतेप्रमाणे फिलिपच्या समलैंगिक प्रियकराला फिलिपचा विरह सहन न झाल्याने त्याने हा खून करवला असे म्हटले जाते. फिलिपच्या वधानंतर अलेक्झांडर मॅसेडोनियाचा राजा बनला व त्याने जग जिंकायची मोहीम आखली.[ संदर्भ हवा ]