फिरंगोजी नरसाळा
फिरांगोजी नरसाळा हे तूर्तास भूपाळगड चे किल्लेदार होते. फिरंगोजि नरसाळा यांच्या नंतर, "दौलतराव गायकवाड" हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत निष्ठावान साथीदार होते.स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी पासून दौलतराव गायकवाड हे शिवरायांचे फक्त साथीदार नसून ,त्यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा होते दौलतराव यांची अत्या शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ बंधूंच्या (संभाजीराजे शहाजीराजे भोसले) पत्नी होत्या.त्यानंतर दौलतराव गायकवाड यांची मोठी बहीण शिवरायांच्या पत्नी होत्या (सकवरबई गायकवाड).मिर्झाराजे जयसिंग यांच्या तहा नंतर भूपाळगडची किल्लेदारी दौलतराव गायकवाड यांच्या कडे देण्यात आली व त्यांनी ती चोखपणे पार पाडली.
पूर्व जीवन
[संपादन]फिरंगोजी नरसाळे यांचा जन्म पराक्रमी कुलीन क्षत्रिय मराठा परिवारात झाला. शहाजीराजांच्या निष्ठावंतांपैकी एक असणारे फिरंगोजी नरसाळा. जेव्हा शहाजीराजांना कर्नाटकात जाण्याचे हुकूम आले त्यावेळेस महाराष्ट्रातील वडिलोपार्जित जहागिरीची सोय लावण्यासाठी त्यांनी खास मर्जीतली, विश्वासू माणसं निवडली. चाकण परगण्यासाठी त्यांनी फिरंगोजी नरसाळा यांची निवड केली. आदिलशहा आणि मुघल यांच्यात तह झाल्याने चाकण परगणा आदिलशहाच्या ताब्यात गेला. चाकण फिरंगोजीच्या देखरेखीखाली असल्याने फिरंगोजींनाही बादशहाच्या चाकरीत जावे लागले. इ.स. १६४७ साली शिवाजी राजेंनी चाकणवर विजय मिळवत ताबा मिळवला आणि फिरंगोजींनी स्वराज्याची सेवा स्विकारली.
शाहिस्तेखानाशी संघर्ष
[संपादन]औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखानाने ७७ हजार घोडेस्वार व ३० हजार पायदळ एवढी विशाल सेना.असंख्य हत्ती,तोफा व दारूगोळा घेऊन स्वराज्यावर आक्रमण केले. फिरंगोजी नरसाळे यांच्या ताब्यात असलेल्या चाकण चा किल्ला संग्रामदूर्ग या किल्ल्यावर त्याने आक्रमण केले फिरंगोजी नरसाळे यांनी शाहिस्तेखानाशी निकराने झुंज दिली व किल्ला लढत ठेवला, पण अखेर दुर्भाग्याने १५ ऑगस्ट १६६० रोजी त्यांचा पराभव झाला व किल्ले संग्रामदूर्ग त्यांना शाहिस्तेखानाला द्यावा लागला. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी फिरंगोजी नरसाळेंना भूपाळगड चे किल्लेदार बनवले.
संभाजी महाराज व दिलेरखानशी संघर्ष
[संपादन]संभाजी महाराज व दिलेरखानाने भूपाळगडावर केलेल्या आक्रमणाच्या प्रसंगामूळे फिरंगोजी नरसाळे इतिहासात विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या काही मतभेदांमुळे १३ डिसेंबर इ.सन.१६७८ मध्ये संभाजी महाराज दिलेरखानास जाऊन मिळाले. तेव्हा संभाजी महाराज व दिलेरखान यांनी स्वराज्यावर प्रथम आक्रमण म्हणून १७ एप्रिल १६७९ रोजी फिरंगोजी नरसाळे यांच्या ताब्यात असलेल्या भूपाळगडावर आक्रमण केले, परंतु युवराजांवर शस्त्र हल्ला करण्यास फिरंगोजी नरसाळे धजावले नाहीत व काही दिवसांतच भूपाळगड दिलेरखानाच्या ताब्यात दिला. यात दिलेरखानाने ७०० मावळे कैद केले व त्यांचा एक-एक हात कापून सोडून दिले. या प्रकरणानंतर छत्रपती शिवाजी महाराज फिरंगोजींवर चांगलेच संतापले यानंतर फिरंगोजी नरसाळेंचे वर्णन इतिहासात कुठेच पहायला मिळत नाही.