प्लेनो (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८९१मधील प्लेनोचा नकाशा

प्लेनो अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. हे शहर डॅलस-फोर्ट वर्थ महानगराचा भाग आहे. कॉलिन काउंटीतील या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६९,७७६ होती.

येथे अलायन्स डेटा, सिनेमार्क थियेटर्स, डेल सर्व्हिसेस, डॉक्टर पेपर स्नॅपल ग्रुप, एरिक्सन, फ्रिटो-ले, एच.पी. एंटरप्राइझ सर्व्हिसेस, हुआवेई, जे.सी. पेनी, पिझा हट, रेंट-ए-सेंटर, सीमेन्स पीएलएम सॉफ्टवेर सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्यालये आहेत.