प्रिया प्रकाश वारीयर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रिया वारीयर
जन्म प्रिया प्रकाश वारीयर
१२ सप्टेंबर १९९९
पुनकुन्नम, त्रिसुर, केरळ, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१८ ते वर्तमान
प्रमुख चित्रपट ओरु अदार लव
वडील प्रकाश वारीयर

प्रिया प्रकाश वारीयर ही मल्याळम चित्रपटातील एक मॉडेल आणि एक अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिने सर्वाधिक लोकांचे लक्ष वेधले. याचे कारण ओरु अदार लव या मल्याळम चित्रपटातील तिच्या एका २८ सेकंदांच्या एक व्हिडिओ क्लिप ट्रेलरमध्ये ती प्रियकराला आपली भवई आणि डोळ्यांनी प्रेमळ इशारे करते. हा व्हिडीओ ९ फेब्रुवारी रोजी प्रकाशित झाला होता आणि १४ फेब्रुवारीला १ कोटी हिट्स प्राप्त झाले होते. काही तासांच्या कालावधीतच ती गुगलवर सर्वाधिक शोधलेली व्यक्तींपैकी एक बनली. तिचा 'ओरु अदार लव' चित्रपट ३ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित झाला आहे.