प्रवृत्तिमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Active or worldly life; occupancy about the business and pleasures of the world, or with the rites, ceremonies, and works enjoined by religion:

सजीवांची सहज प्राकृतिक (नैसर्गिक) जाणीव आणि त्या जाणीवेनुसार वागणे म्हणजे प्रवृत्ती. लौकिक अथवा सांसारिक जीवनात रममाण राहून भौतिक आणि इंद्रीय सुंखांची कामना आणि प्राप्ती करत जीवन व्यतीत करण्यास प्रवृत्तिमार्ग असे म्हणतात. भारतीय वेदांत तत्त्वज्ञानात सुचवलेल्या चार आश्रमांपैकी पहिले दोन आश्रम ब्रह्मचर्याश्रम, आणि गृहस्थाश्रमाचे लक्षण प्रवृत्तीमार्गी समजले जाते.ब्रह्मचर्याश्रमात केवळ धर्म हाच पुरूषार्थ अभिप्रेत आहे काम हा पुरूषार्थ ब्रहमचर्यात अभिप्रेत नसला तरी भविष्यातील गृहस्थाश्रमाचे कर्तव्य आवश्याक मानले जाते.. गृहस्थाश्रमाचा अंगिकार करून चार पुरूषार्थ अर्थ काम यांचा उपभोग घेणे प्रवृत्तिमार्गाचे प्रमूख लक्षण आहे मानले जाते हे करतानाच धर्म हा पुरूषार्थही करावा आणि मोक्ष पुरूषार्थाची पूर्व तयारी करावी असे वैदिक तत्त्वज्ञानास अभिप्रेत आहे.सकाम (लाभाची अपेक्षा असलेला) कर्मयोग हा प्रवृत्तीमार्गाचा धर्म आहे[ संदर्भ हवा ]

वानप्रस्थाम आणि संन्यासाश्रम हे निवृत्तीकडे आणि धर्म आणि मोक्ष साधनेचे मार्ग आहेत.

प्रवृत्तीमार्गाचे स्वाभाविक प्राधान्य स्वार्थास जाते परार्थास नाही. भारतीय वैदिक धर्माने मोक्षप्राप्तीकरीता आणि दुःखापासून दूर जाण्याकरीता निवृत्तिमार्ग सुचवलातरी निवृत्तिमार्ग अंगिकारण्यापुर्वी आणि नंतर जरूर भासेल त्या प्रमाणे सांसारिक जीवनाच्या कर्तव्यांच्या पुर्ततेची आणि स्मतोअल साधण्याची अत्यावश्यकता प्रतिपादीत केली.फळाची/लाभाची अपेक्षा न धरता केलेला निषकाम कर्मयोग हे निवृत्तीमार्गाचे वैशिष्ट्य [१]

पण वस्तुतः मोक्ष प्राप्ती हे अंतीम ध्येय मानले गेले आणि निवृत्तीही मानसिक स्थिती आहे जिच्याकरिता कोणताही आश्रम सोडला पाहिजे किंवा स्विकारला पाहिजे असे नाही.तमो गुण रजोगुणांचा आणि इतर विकारांचा त्यागकरून सात्त्विक बानवणे आणि त्यानंतर निवृत्ती असा मार्ग वैदिक धर्माने सांगितला.


प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग म्हणजे केवळ वैदिक धर्मास अभिप्रेत मार्ग असेच नाही. प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या मार्गाबाबत प्रत्येक भारतीय दर्शनाता तत्त्वज्ञानात आणि अगदी तत्त्ववेत्त्याच्या पातळीपर्यंत मार्गदर्शनातील फरक आढळत जातात किंवा न रूचण्या मार्गावर टोकाची टिका देखिल आढळते[ संदर्भ हवा ]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भयादी[संपादन]

  1. ^ प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्याकार्ये भयाभये । बन्धं मोक्षं च या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्त्विकी ॥ १८-३० ॥ हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग व निवृत्तिमार्ग, कर्तव्य व अकर्तव्य, भय व अभय तसेच बंधन व मोक्ष यथार्थपणे जाणते, ती सात्त्विक बुद्धी होय. ॥ १८-३० ॥ श्रीमद्‌भगवद्‌गीता : अठरावा अध्याय (मोक्षसंन्यासयोग)