प्रभाकर (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभाकर हे मराठी भाषेतील वृत्तपत्र मुंबई येथे सन १८४१-१८६१ या कालावधीत भाऊ महाजन हे संपादक प्रकाशित करत होते.

इतिहास[संपादन]

अखबार पत्राला आपला संसार फार दिवस चालू ठेवणे शक्य झाल्याचे आढळत नाही. ते लौकरच बंद पडले. अखबार नंतर निघालेले प्रभाकर हे पत्र मात्र बरीच वर्ष म्हणजे किमान २० वर्ष तरी अव्याहतपणे चालू राहिले. प्रभाकर पत्र गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन तथा कुंटे यांनी ankit दिवशी १८४१ साली सुरू केले. भाऊ महाजन हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या पेक्ष्या वयाने एक दोन वर्षीनी लहान होते. शुद्धी चळवळीसारख्या सामाजिक आंदोलनात ते बाळशास्त्रीचे सहकारी होते. पत्राशी बाळशास्त्राच्या कितपत संबंध होता हे सांगणे कठीण आहे. परंतु भाऊ व बाळशास्त्री हे दोघेही बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सदाशिव काशिनाथ उर्फ बापू छत्रे यांच्याकडे विद्याभ्यासासाठी एकत्र राहिलेले असल्याने लहानपणापासून त्यांना एकमेकांशी चांगला परिचय होता. यामुळे प्रभाकरला बाळशास्त्री यांचे निकटचे साह्य नसले तरी मार्गदर्शन लाभले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. १८६२ साली भाऊ महाजन आपल्या चिरंजीवासोबत नागपूरला गेले. प्रभाकर पत्राचा आकार ११ गुणुले ९ इंच असून प्रतेकी दोन कॉलमांची त्याची आठ पाने असत. त्याची वार्षिक वर्गणी १२ रुपये होती व ते शीला छापखाण्यात छापले जात असे. कोणास काही या पत्राचे कर्ते यास लिहून पाठवायचे असल्यास त्यांनी गणपत कृष्णाजी यांचे छापख्यान्यात लिहून पाठवायचे म्हणजे आम्हास पोचेल अशी आमची त्यास विनंती आहे. अशी सूचना २१ नोहेंबर १८४१ च्या अंकात आढळते. छापख्यान्याची जागा लोकांनी नेमकी कळावी किवा अन्य काही कारणास्तव काही अंकाच्या शेवटी हा छापखाना बोरीबंदरचे लौनीजवळ गावात बाबादेवाच्या ओळीत आहे, असेही एक वाक्य आढळते. १ जुले १८४२ पासून मात्र प्रभाकर स्वतःच्या छापखान्यात छापू लागला. त्या तारखेच्या अंकावर मुंबई प्रभाकर छापखान्यात हरी नारायण खाडीलकर यांनी छापून प्रसिद्ध केले असे. असा मजकूर अढळतो. पुढल्याच अंकात शेवटी या पत्राच्या शेवटी कोणास काही लिहून पाठवणे असल्यास कोलमाटवाडीत हा छापखाना आहे. तिथे लिहून पाठवले म्हणजे पोहचेल. हा छापखाना नवीन घातला आहे अशी सूचना केली होती.[ संदर्भ हवा ]  

 समारोप[संपादन]

प्रभाकरचे संपादक सर्वच विषयांवर आपली लेखणी चौफेर चालवीत. दर्पणात बाळशास्त्री जांभेकर अगदी ब्रिटीश राजवटीवरही टीका करण्यास मागेपुढे पाहत नसत. पण त्यंच्या एकदरीत स्वभावामुळे त्यांची टीका सौम्य असे.  प्रभाकराचे संपादक भाऊ महाजन यांनी सरकारी नोकरीची व मेहरबानीची शृंखला घालून घेण्याचे मुळातच टाळले. यामुळे ते अगदी निर्भीडपणे आणि स्पष्ट लिहू लागले. महाजन यांनी २२ वर्षे पत्रव्यवहार केला. १८९० साली भाऊचे निधन झाले. नंतर काही लेखन त्यांनी केल्याचे आढळत नाही. नागपूर भागात वृत्तपत्राचा उपक्रम त्यांनी केला नाही. व त्यासाठी काही हालचालीही त्यांनी केल्या नाही एवढ्या दीर्घ काळ हा कर्तुत्वान विद्वान स्वस्थ बसून राहिला याचे राहून राहून आश्चर्य वाटते.[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]