प्रदीप शर्मा (पोलीस अधिकारी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस निरीक्षक आहेत. ते चकमकफेम म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली. एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते तेव्हा चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवले.[१]

शर्मा यांचा जवळपास ३१२ चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक गुंडांचा एनकाऊंटरमध्ये खात्मा केला आहे, त्यांत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. लखनभैया बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर २००८ साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. [२]

नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. २०१३ मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.[३]

प्रदीप शर्मा यांचे निलंबन नऊ वर्षांनी, २४ ऑगस्ट २०१७ रोजी संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. मात्र त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै २०१९ रोजी तडकाफडकी राजीनामा दिला.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा का इस्तीफा मंजूर, शिवसेना में होंगे शामिल!". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "'जेल में नहीं, अस्पताल में बिताया वक्त', चुनाव लड़ रहे 'एनकाउंटर स्पेशलिस्ट' का वीडियो वायरल". Jansatta (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा को लोगों ने जिताया या हराया?". LallanTop - News with most viral and Social Sharing Indian content on the web in Hindi (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "'एनकाउंटर स्पेशलिस्ट' पुलिस अफसर प्रदीप शर्मा का इस्तीफा मंजूर, बनेंगे नेता?". Navbharat Times (हिंदी भाषेत). 26 मे 2020 रोजी पाहिले.