Jump to content

प्रतिकूल परिणाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वैद्यकशास्त्रात, एखाद्या औषधामुळे किंवा शस्त्रक्रियेसारख्या इतर हस्तक्षेपामुळे होणारा त्रासदायक आणि अवांछित परिणाम म्हणजे प्रतिकूल परिणाम होय.

मुख्य उपचारात्मक परिणामाशी दुय्यम संबंध असल्यास प्रतिकूल परिणामास अनुषंगिक परिणाम असे म्हणले जाते. अनुचित किंवा चुकीच्या मात्रेमुळे किंवा प्रक्रियेमुळे प्रतिकूल परिणाम झाल्यास त्याला उपद्रव न म्हणता 'वैद्यकीय गफलत' म्हणतात. वैद्यकव्यवसायी/उपचारामुळे उद्भवलेले असल्याने प्रतिकूल परिणामांना काही वेळा 'वैद्यनिर्मित' असे म्हणले जाते.