विकिपीडिया:धूळपाटी/मराठी पत्रकार
Appearance
(प्रकाश पोहरे या पानावरून पुनर्निर्देशित)
शरद निवृत्ती लोणकर(पत्रकार)
'सलाम पुणे'चे अध्यक्ष आणि पत्रकार - शरद निवृत्ती लोणकर (जन्मतारीख - २६ जानेवारी १९६६) हे इ.स. १९८४ पासून पुण्यात पत्रकारिता करीत आहेत.
- इ.स. १९८४ ते २००५ या काळात महापालिका वार्तांकन, आणि पुणे क्राईम वृत्तांकन केले
- पुण्याच्या रस्त्याखाली ३० फूट खोल उतरून कात्रज ते शनवार वाडा दरम्यानच्या पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्ष माग काढून वार्तांकन करणारा पहिला पत्रकार म्हणून त्यांना मान मिळवला
- महापालिकेतील जकात विभागाबाबत लक्षणीय वार्तांकन
- महापालिकेतील टी.डी.आर. घोटाळयाकडे सर्व प्रथम लक्ष वेधले ,
- पुणे दर्शन या भारतातील पहिल्या खाजगी वृत्त वाहिनीत मुख्य वार्ताहर म्हणून काम करताना तत्कालीन मुख्यमंत्री जोशी यांच्या जावयाचे बेकायदा बांधकाम सर्वप्रथम उघड केले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत पडसाद आणि पुढे राज्यभर हा विषय गाजला .
- येरवडा कारागृह आणि येरवडा मनोरुग्णालय यांवर संपूर्ण प्रकाशझोत टाकणारी प्रत्येकी १०० भागांची वृत्त मालिका करून 'पुणेदर्शन'द्वारे ती प्रकाशित केली.
दिनमान या पुण्यातील केबल वृत्त वाहिनी मध्ये ३ वर्षे वृत्त संपादक म्हणून काम केले.
- दैनिक गावकरी पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून ३ वर्षे काम
- दैनिक पुढारी मध्ये ३ वर्षे क्राईम रिपोर्टर ; संध्यानंद मध्ये पिंपरी चिंचवड मुख्य प्रतिनिधी म्हणून २ वर्षे काम
- निगडीतील एम. डी विजयराज नावाच्या २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या एल.टी.टी.ई.च्या हस्तकाचा सर्व प्रथम पर्दाफाश केला. मात्र विजयराज फरार झाला. त्यानंतर गुन्हा दाखल. पुण्याच्या पुढारीच्या कार्यालयातील पहिला क्राईम रिपोर्टर; तब्बल ९६ आठवडे सलग पोलीस डायरी नावाचे सदर पुढारीत चालवले.
- व्हीडीओ पायरसी, दुबई मध्ये नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱया अनेक बोगस फायनान्स कंपन्या यांचा पर्दाफाश, बालाजीनगर मधील भोंदूबाबाचा पर्दाफाश, अशा अनेक बातम्यांमुळे तत्कालीन पी आय सुरेश पोटे, राजेंद्र जोशी, पी एस आय ढोकले आदींनी पोलिसात गुन्हे दाखल करून भामट्यांना अटक केली. महाराष्ट्रातील लेडीज बार विरुद्ध सर्वप्रथम २००३पासून बार बंद होईपर्यंत लिखाण
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जीवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले.
- २०१४ मध्ये इराक मधील दहशतवादी कारवायांमुळे बसरा शहरातील एका बांधकाम कंपनीत अडकून पडलेले आणि पुन्हा भारतात येण्यासाठी धडपडणाऱ्या लातूरच्या ५ जणांना शासकीय स्तरावरून मदत पोहोचविली आणि सुखरूप मायदेशी आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
- आजीव सदस्य - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
- आजीव सदस्य - महाराष्ट्र साहित्य परिषद
- २००२ ते २०११ अशी तब्बल ९ वर्षे सलग महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सेक्रेटरी पदावर काम.
- २०११पासून 'सलाम पुणे' या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम सुरु.
- सिनेकलावंताना पुरस्कार, चित्रपट पुरस्कार, पत्रकारांना पुरस्कार, मराठी सिनेमाचे तसेच मराठी मालिकांचे प्रमोशन, मराठी कलावंताशी थेट गप्पा, गाणी-नृत्य-हसवा-हसवी अशा असंख्य कार्यक्रमाचे आयोजन-संयोजन
असे असंख्य स्टेज शो ..
- 'आदेश ' या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जिवनावरील मराठी चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका .
- mymarathi.net या पुण्यातील पहिल्या स्वतंत्र अशा ऑनलाईन न्यूज पोर्टल च्या संपादक पदी २०१४ पासून काम ..
- महिलांच्या छेडछाडीविरोधात 'मारमगुप्पी' नावाच्या गाण्याची व्हिडीओ निर्मिती ,
- भारतभरात जामिना अभावी खितपत पडलेल्या असंख्य कैद्यांच्या समस्येला चव्हाट्यावर आणण्यासाठी 'जमानत ' नामक हिंदी लघुपटाची निर्मिती
- लेखकाला पडलेले स्वप्न ..'अश्वत्थामा' या मराठी लघुपटाची निर्मिती