पोप सर्जियस दुसरा
Jump to navigation
Jump to search
सर्जियस दुसरा (??? - जानेवारी २७, इ.स. ८४७) हा इ.स. ८४४ ते मृत्युपर्यंत पोप होता.
ग्रेगोरी चौथ्याच्या मृत्युनंतर रोममधील जनतेनी आर्चडीकन जॉनला पोप निवडले पण उच्चवर्गातील लोकांनी सर्जियसची निवड केली. त्यानंतरच्या झटापटीत जॉनला पकडण्यात आले व सर्जियसने त्याचा मृत्युदंड माफ केला.
सर्जियस पोप झाला परंतु त्याला पवित्र रोमन सम्राट लोथारची मान्यता नव्हती. लोथारने आपल्या मुलाला सैन्य घेउन सर्जियसला पदच्युत करण्यासाठी पाठवले. सर्जियसने संधि करून पोपपदाच्या बदल्यात लोथारला लॉम्बार्डीचा राजा घोषित केला.
पुढे सर्जियसच्या पोपकालात साराकन सैन्याने रोम वर हल्ला करून लुटुन नेले. याकाळात रोममध्ये भ्रष्टाचार व लाचखोरी अनिर्बंध चालु होती.
मागील: पोप ग्रेगोरी चौथा |
पोप इ.स. ८४४ – जानेवारी २७, इ.स. ८४७ |
पुढील: पोप लिओ चौथा |