पोप बॉनिफेस सातवा
Jump to navigation
Jump to search
पोप बॉनिफेस सातवा ( - जुलै २०, इ.स. ९८५) हा प्रतिपोप होता. याला पोप मानले जात नाही.
याचे मूळ नाव फ्रॅंको फेरुची असे होते.
याने पोप बेनेडिक्ट सहाव्याला मृत्युदंड दिल्याची वदंता आहे. बेनेडिक्टच्या मृत्यूनंतर रोमच्या जनतेच्या क्षोभाला घाबरुन बॉनिफेसने कॉन्स्टेन्टिनोपलला पळ काढला. जाताना त्याने अमाप खजिना आपल्या बरोबर नेला. इ.स. ९८४मध्ये बॉनिफेस परतला व पोप जॉन चौदाव्याला त्याने पदच्युत करून त्याचा खून करवला. पुढच्या वर्षी बॉनिफेसचा स्वतःचाच खून झाला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |