पॉलस पॉटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॉलस पॉटर (१६२५ (?) - १६५४) हा डच चित्रकार होता. हा डच चित्रकलेच्या सुवर्णयुगातील एक चित्रकार होता. याचा चित्रांमध्ये अनेकदा प्राणी आणि निसर्गदृश्ये असत. याने आपल्या जीवनकालात सुमारे १०० चित्रे रंगवली. त्यांतील खोंड (द यंग बुल), गुराख्याचा पोर (शेफर्ड बॉय), गायी आणि मेंढ्या ही चित्रे प्रसिद्ध आहेत.