Jump to content

रतिचित्रण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पॉर्नोग्राफी या पानावरून पुनर्निर्देशित)
रतिचित्रण दृष्यातील मुखपृष्ठ

रतिचित्रण (इंग्रजी: Pornography / Porn, पॉर्नोग्राफी / पॉर्न) किंवा रती म्हणजे लैंगिक उत्तेजनार्थक आणि लैंगिक समाधानासाठी उघड संभोगाचे चित्रीकरण होय.

रतिचित्रण वेगवेगळया माध्यमातून चित्रित केले जाउ शकते, उदा. पुस्तके, नियतकालिके, पत्रपत्ता, छायाचित्रे, मूर्ती, चित्र, सचेतना, ध्वनिमुद्रण, चित्रपट, दृष्य, किंवा दृष्य खेळ. तथापि, प्रत्यक्ष प्रेक्षकांपुढे केलेली लैगिक कृत्यांस, व्याख्येप्रमाणे रतिचित्रण समजले जात नाही, कारण व्याख्येप्रमाणे ही संज्ञा कृत्यास नव्हे तर कृत्याच्या चित्रीकरणास संबोधली जाते. म्हणूनच सेक्स शो आणि स्ट्रीपटीझ हे रतिचित्रणात वर्गीकृत केले जात नाही.

रतिचित्र नमुना रतिचित्रण-छायाचित्र काढण्यासाठी डौलाकारात राहतो. तर रतिचित्रण कलाकार किंवा रतिसितारा रतिचित्रपटात काम करतो. ज्या परिस्थितीत फक्त नाट्यमय कसबे वापरली जातात, अश्या वेळी रतिचित्रपटातल्या कलाकारास "रतिचित्र नमुना" म्हणतात.

रतिचित्रण पुष्कळवेळा अश्लीलतेच्या कारणाने मुद्रणवेळेस मुद्रणपर्यवेक्षण अधिकारी आणि कायदेशीर निर्बंधाचे लक्ष्य बनली आहे. ही कारणे आणि रतिचित्रणाची व्याख्या ह्यामध्ये विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि देशीय संदर्भानुसार वैविध्य आढळते.

२०व्या शतकाच्या उत्तरार्ध लैंगिकतेकडे सहिष्णूतेने पहाण्याचा लोकांचा वाढता कल आणि कायद्यामध्ये अश्लीलतेच्या व्याख्येचे जास्त सुस्पष्टीकरणामुळे रतिचित्रणाचे उत्पादन आणि उपभोगासंबंधी उद्योगास चालना मिळाली. घरगुती दृश्य आणि आंतरजालाच्या सूतोवाचामूळे रतिउद्योगात लाक्षणिक प्रगती झाली आणि सध्या संपूर्ण जगतामध्ये एका वर्षाकाठी अब्जावधी डॉलरची कमाई व्हायला लागली.

लैंगिक गुन्ह्यांवरील परिणाम

[संपादन]

सांख्यिकी

[संपादन]

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पाहणीनुसार दोन तृतीयांश स्त्रिया रतिचित्रण पहातात.[] आणि १८ ते ३४ वयोगटातील ७०%हून अधिक पुरुष महिन्यातून ठराविकवेळा रतिचित्रण संकेतस्थळांना भेटी देतात.[]

प्रति-रतिचित्रण चळवळ

[संपादन]
A French caricature on "the great epidemic of pornography."

सामान्यत: रतिचित्रणास कायदाकायदे, धर्म आणि स्त्रीवादी ह्यांच्याकडून विरोध होतो, तथापि केवळ ह्या गटाकडूनच विरोध होतो असे नाही.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ पिअर्स, डल्सी. "६६ ऑफ वुमेन वॉच पॉर्न". द सन (इंग्रजी भाषेत). लंडन.
  2. ^ "स्टॅटिस्टिक्स ऑन पॉर्नोग्राफी. सेक्शुअल अडिक्शन ॲंड ऑनलाइन पेर्पेट्रेटर्स ॲंड देअर इफेक्टस ऑन चिल्ड्रन, पेस्टर्स ॲंड चर्चेस (मराठी: रतिचित्रणाविषयी सांख्यिकी: कामविषयक सवयी, ऑनलाइन प्रसारक-घटक व मुले, पेस्टर आणि चर्च यांवरील परिणाम)" (इंग्रजी भाषेत).