पॉंइंटिंग उपकरणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.



पाँइंटिंग, म्हणजे बोट दाखवणे हा खरे तर मनुष्याचा स्वभाव आहे. पाँइंटिंग उपकरणे हि सिस्टीम युनिटमधल्या हव्या त्या बिंदूवर जाऊन निवडलेल्या मेंन्यूच इनपुटमध्ये रुपांतर करतात. माऊस, जॉयस्टीक, तच स्क्रीन, लाइट पेन आणि स्टायलस असे पाँइंटिंग उपकरणांचे प्रकार आहेत.

माऊस[संपादन]

मॉनिटरवर दिसणाऱ्या पाँइंटरवर माऊस नियंत्रण ठेवतो. माऊस पाँइंटर साधारणपणे बाणाच्या आकाराचा असतो. ज्या प्रकारच्या ॲप्लिकेशन चालू असेल, त्यानुसार माऊसचा आकार बदलतो. माऊसला एक, दोन किंवा त्याहूनही अधिक बटणे असू शकतात. या बटणांचा उपयोग कमांड पर्याय निवडण्यासाठी आणि मॉनिटरवर माऊसचा पाँइंटर नियंत्रित करण्यासाठी होतो. काही माऊसना व्हील बटण असते. मॉनिटरवर माहिती बघताना, वर-खालच्या पानांवर जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माऊसचे निरनिराळे प्रकार आहेत. तीन मूलभूत प्रकार याप्रमाणे.

ऑप्टिकल माऊस[संपादन]

ऑप्टिकल माऊसमध्ये फिरणारा भाग नसतो. हा सध्या सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. माऊसबाहेर पडणारा प्रकाश माऊसच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. ऑप्टिकल माऊस कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावर वापरता येतो.

मेकॅनिकल माऊस[संपादन]

या माऊसच्या तळाशी गोलाकार फिरणारा चेंडू असतो. तो वायरने सिस्टीम युनिटला जोडलेला असतो. मऊ, सरळ पृष्ठभाग किंवा माऊस पॅडवरून माऊस फिरवला कि रोलर चेंडू फिरतो आणि मॉनिटरवरचा पाँइंटर नियंत्रित केला जातो.

कॉर्डलेस किंवा बिनतारी माऊस[संपादन]

या प्रकारचा माऊस बॅटरीवर चालतो. सिस्टीम युनिटशी संपर्क साधण्यासाठी कॉर्डलेस माऊस हा रेडीओ लहरी किंवा इन्फ्रारेड लहरींचा उपयोग करतो. या माऊसला वायरची गरज नसल्यामुळे डेस्कवर मोकळी जागा उरते.

ट्रॅकबॉल्स[संपादन]

टच सरफेस, आणि पाँइंटिंग स्टिक हि तीन उपकरणहि माऊससारखीच आहेत. ट्रॅकबॉल्सला रोलरबॉल देखील म्हणतात. बोटांनी कीबोर्डच्या लहान चेंडू फिरवून पाँइंटर नियंत्रित करता येते. टच सरफेस किंवा टचपॅडच्या पृष्ठभागावर बोट फिरवून किंवा दाबून पाँइंटर नियंत्रित करता येतो. कीबोर्डमध्ये असलेली पाँइंटिंग स्टिक बोटांनी हलवून पाँइंटर नियंत्रण करता येते.