पॅट्रिक ली फरमोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅट्रिक ली फरमोर (इ.स. १९१५ - इ.स. २०११) एक इंग्लिश लेखक होते. त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी इंग्लंडहून तुर्कस्तानपर्यंत पायी प्रवास केला. या प्रवासाचे हंगेरीपर्यंतच्या भागाचे वर्णन त्यांनी वयाच्या बासष्ठाव्या वर्षी लिहून अ टाईम ऑफ गिफ्ट्स या नावाखाली प्रकाशित केले. हे पुस्तक इंग्रजी भाषेतले अद्वितीय आणि सर्वोत्कृष्ट प्रवास वर्णन समजले जाते. पुढे फरमोर यांनी उर्वरीत प्रवासाचे वर्णन आणखी दोन खंडात लिहीले. त्यांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध नाहीत.