Jump to content

पॅट्रिक मॅथ्यू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पॅट्रिक मॅथ्यू (ऑक्टोबर २०, इ.स. १७९० - जून ८, इ.स. १८७४) हे स्कॉटिश निसर्गशास्त्रज्ञ आणि फळशेतीतज्ज्ञ होत. त्यांनी प्रथम इ.स. १८३१ मध्ये नैसर्गिक निवडीचं तत्त्व मांडलं. यांनी जीवशास्त्राचे संशोधनही केले. चार्ल्‌स डार्विन यांनीही पॅट्रिक मॅथ्यू यांनीच नैसर्गिक निवडीचं तत्त्व आधी मांडले असे मान्य केले होते.

प्रमुख विचार/संशोधन

[संपादन]
  • यांनी नेव्हल टिंबर अँड आर्बोरिकल्चर नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथात नौदलाला लागणाऱ्या लाकडाचे उत्पादन फळबागांमधूनही होऊ शकेल असा विचार मांडला. तसेच या ग्रंथात वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांची माहिती दिलेली होती.
  • उत्क्रांतिवाद - नैसर्गिक निवडीचं तत्त्व यावर एक परिशिष्ट आपल्या ग्रंथाला जोडले.