पुरूषोत्तम मंदिर, पुरूषोत्तमपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

माजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरूषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात उध्वस्त मंदिराचे पुरातन अवशेष सापडले. माजलगांव पासून २२ कि.मी.अंतरावर असणा-यागोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरीला पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. भगवान पुरूषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या पोटावर वसलेलं आहे. तीव्र दुष्काळामुळे गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. कोरड्या पडलेल्या या पात्रात काही पूरातन अवशेष सापडले. त्यात स्तंभशीर्ष, स्तंभस्थळ, जांघा भागेवरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाशी विविध घडीव शिळांच्या समावेश आहे याच अवशेषात एक सतीची शिळा असून, ती साडेतीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो आशिवंचनावस्थेत आहे. याच शिळेवर एकूण तीन शिल्पे कोरलेली आहेत. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी मंदिराचे स्थापत्य कलेतील वेगळेपण असे की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. हे मंदिर इसवी सन १३१0 मध्ये रामचंद्र देव यादवांचा मंत्री पुरुषोत्तम याने उभारले. यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले. मंदिरातील मुख्य देवतेलाही याच नावाने ओळखले जाते. इतिहासाच्या दृष्टीने पुरुषोत्तमपुरीस मोठे महत्त्व असून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञात ताम्रपट इथेच सापडला आहे. आजपर्यंत उपलब्ध सर्व ताम्रपटात हा ताम्रपट वजनाने व आकारानेही मोठा मानला जातो. यात रामचंद्र देव यादवाने मंदिर उभारणीसाठी व मंदिराच्या देखरेखीसाठी पंचक्रोशीतील वृंदाना आजूबाजूची गावे दान दिल्याचा उल्लेख आहे. पुरुषोत्तमपुरी महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनात र्शावण महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरीत पुरूषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गोदाकाठी राक्षसभूवन, पुरूषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत. त्यात पुरूषोत्तमपुरीचे मंदीर उल्लेखनीय ठरते. गोदावरीच्या पात्रात पूर्व पश्चिम प्रवाहात जवळपास हजार फूट अंतरापर्यंत हे अवयव अस्ताव्यस्त पसरले आहेत. यात स्तंभशीर्ष, स्तंभतळ, मंदिरावरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाच्या विविध भागातील घडीव शिळांचा समावेश आहे. या अवशेषात एक सतीची शिळा सापडली असून ती साडेतीन फूट उंच व दीड फूट रंद आहे. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो घोट्यापासून 90 अंशात सरळ वर आशिर्वचनावस्थेत आहे. हाताखालची धावत्या घोड्यावर स्वार व्यक्तिचे शिल्प असून घोड्याचा लगाम धरलेली व्यक्ति पुढे धावते आहे. या शिल्पाखाली पुन्हा तिसरे शिल्प असून त्यात स्त्री पुरुषास निद्रावस्थेत दाखविण्यासाठी आडवे कोरले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात एका प्राचीन घाट उघडा सापडला असून हा घाट यादवांच्याही अगोदरच्या काळातील असावा.अंदाज जिल्ह्यातील इतिहास संशोधक डॉ. सतीश साळूंके यांनी पुरूषोत्तमपुरी येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर केला. षुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तम मंदिराया विटा पाण्यावर तरंगतात. [१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पुरूषोत्तमपुरीच्या उद्ध्वस्त मंदिराचे गोदावरी नदीपात्रात अवशेष".