पुराभिलेखागार
पुराभिलेखागार (इंग्लिश: Archive, आर्काइव्ह) म्हणजे कागदपत्रांचा दप्तरखाना होय.
अनुक्रमणिका
व्युत्पत्ति[संपादन]
मराठीत पुरा म्हणजे जुने, प्राचीन, अभिलेख म्हणजे कागदपत्र, तर आगार म्हणजे साठवणुकीची जागा होय. या शब्दांवरून "जुन्या कागदपत्रांच्या साठवणुकीचे आगार" अशा अर्थाचा पुराभिलेखागार हा शब्द तयार झाला आहे.
पुराभिलेखागार[संपादन]
महाराष्ट्रातील पुराभिलेखागार[संपादन]
महाराष्ट्र पुराभिलेखागाराला इ.स. २०११ मध्ये १९० वर्षं पूर्ण झाली. हे मुंबईच्या फोर्ट भागातील एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या इमारतीत आहे. त्यात मराठा साम्राज्य, इ.स. १८५७चा उठाव, भारतातील ब्रिटिश राजवट ते भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा संपूर्ण इतिहास आहे. या पुराभिलेखागारातला पहिला कागद इ.स. १६३० सालचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेखागार विभागाने ठिकठिकाणची दप्तरे (विविध सरदार घराणी, महाराष्ट्रातील विविध संस्थानांकडे असलेले कागदपत्रांचे रुमाल) आपल्याकडे घेतली. त्यामुळेच आज केवळ ब्रिटिश आमदनीतलाच नव्हे, तर मराठा साम्राज्य, निजामशाही अशा वेगवेगळ्या कालखंडातील दस्तऐवज महाराष्ट्र पुराभिलेखागाराकडे आहेत. यात प्रामुख्याने मोडी लिपीतील दस्तऐवज आहेत.
हेही पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- "महाराष्ट्राचा दप्तरखाना" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स.
बाह्य दुवे (परभाषी)[संपादन]
- "युनेस्को पुराभिलेखागाराचे संकेतस्थळ – जगभरातील ८००० दुवे" (इंग्लिश मजकूर).[मृत दुवा]
- "इंतरनॅशनल काउन्सिल ऑफ आर्काइव्ह" (इंग्लिश मजकूर).
- "आर्काइव्ह्ज हब - युनायटेड किंग्डम येथील विद्यापीठांच्या व महाविद्यालयांच्या पुराभिलेखागारांचे पोर्टल, नॅशनल आर्काइव्ह्ज नेटवर्क उपक्रमाचा भाग" (इंग्लिश मजकूर).
- "इंटरपेअर्स प्रोजेक्ट - अस्सल डिजिटल दस्तऐवजांच्या दीर्घकालीन जतनाचा आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प" (इंग्लिश मजकूर).
- "जगभरातील पुराभिलेखागारांचा ऑनलाइन वाटाड्या" (इंग्लिश मजकूर).
- "ब्रिटिश कार्टून आर्काइव्ह - केंट विद्यापीठाशी संलग्न असणारे ब्रिटिश व्यंगचित्रांचे पुराभिलेखागार" (इंग्लिश मजकूर).
- "डिजिटल आर्काइव्ह ऑफ लिटरसी नॅरेटिव्ह्ज" (इंग्लिश मजकूर).
- "बांको दि सान ज्यॉर्ज्यो - गेनोव्हा, इटली : इ.स. १४०५ ते इ.स. १८०५ काळातील कागदपत्रांचे पुराभिलेखागार" (इंग्लिश मजकूर).
- "स्लाव्हिक पुराभिलेखागार" (इंग्लिश मजकूर).
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |