पी.एन. पणिक्कर
Appearance
पुथुवाययल नारायणा पणिक्कर (पी. एन. पणिक्कर) यांचा जन्म १ मार्च १९०९ रोजी नीलमपरूर येथे झाला. पुथुवाययल नारायणा पणिक्कर यांना केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचा जनक म्हणून ओळखले जाते.
कार्य
[संपादन]- त्यांनी आपल्या गावी शिक्षक म्हणून सनातनधर्म ग्रंथालय सुरू केले होते.
- त्यांनी १९४५ मध्ये त्यांनी ४७ ग्रामीण ग्रंथालयांसह तिरुविथामकूर ग्रंथशाला संघम (त्रावणकोर लाइब्रेरी असोसिएशन)ची स्थापना केली होती.
- त्यांनी केरळमधील खेड्यातून ते गावोगावी प्रवास करून लोकांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. अशा प्रकारे ते त्याच्या नेटवर्कमध्ये ६०००हून अधिक ग्रंथालये जोडण्यात यशस्वी झाले होते.
- १९७५ मध्ये ग्रंथशाला संघमला युनेस्को कडून 'कृपसकय अवॉर्ड' देण्यात आला. पणिक्कर एकूण ३२ वर्षे ‘केरला ग्रंथशाला संघम’चे वर्ष १९७७ पर्यंत सरचिटणीस होते.
- वर्ष १९७७ मध्ये त्यांनी केएनएफईडीची स्थापना केली. केएनएफईडी हे केरळ राज्य साक्षरता अभियान सुरू करण्यात मोलाची भूमिका बजावत होते आणि यामुळे केरळला सार्वत्रिक साक्षरतेच्या चळवळीकडे नेले गेले. अशा प्रकारे, केरळ हे सार्वत्रिक साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य बनले.
- पणिक्कर यांनी अॅग्रीकल्चरल बुक्स कॉर्नर, द फ्रेंडशिप व्हिलेज मूव्हमेंट (सौरुडग्राम), कुटुंबांसाठी वाचन कार्यक्रम, पुस्तके व अनुदान ग्रंथालयांचे अनुदान आणि बेस्ट रीडर अॅवॉर्ड पी.एन. पॅनीकर फाऊंडेशन इत्यादी कार्यास प्रोत्साहन दिले.
सन्मान / गौरव
[संपादन]- त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त १९ जून हा केरळमध्ये वर्ष १९९६ पासून वायनादिनम् (वाचन दिन) म्हणून पाळला केला जातो. केरळमधील शिक्षण विभागा मार्फत देखील त्यानिम्मित १९-२५ जून वाचन सप्ताह पाळला केला जातो.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१७ मध्ये १९ जून हा केरळचा ‘वाचन दिन’ हा राष्ट्रीय वाचन दिन म्हणून घोषित केला.
- पणिक्कर यांचे १९ जून १९९५ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. केरळ सरकारने त्यांच्या साक्षरता, शिक्षण आणि ग्रंथालय चळवळीच्या कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी १९ जून हा वायनादिन (वाचन दिवस) म्हणून साजरा करावा, असा आदेश दिला. २१ जून २००४ रोजी टपाल विभागाने स्मारक टपाल तिकीट जारी करून पानिकरचा सन्मान केला.
- २०१० मध्ये पी एन एन पणिक्कर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली गेली.
संदर्भ
[संपादन]- https://navbharattimes.indiatimes.com/education/gk-update/national-reading-day-celebrated-today-know-who-was-pn-panicker/articleshow/76461402.cms
- https://en.wikipedia.org/wiki/P._N._Panicker
- https://www.indiatoday.in/education-today/gk-current-affairs/story/remembering-p-n-panicker-father-of-library-movement-1690670-2020-06-19
- https://www.pnpanickerfoundation.org/ Archived 2021-07-09 at the Wayback Machine.