पी-नोट्‌स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पी-नोट्‌स हे पार्टिसिपेटरी नोट्‌स या शब्दाचे लघुरूप आहे. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी त्याचा वापर करतात. यामध्ये त्या गुंतवणूकदारांनी थेट शेअर खरेदी करण्याची किंवा सेबीकडे नोंदणी करण्याची गरज नसते. उदाहरणार्थ, भारतीय ब्रोकर शेअर खरेदी करतात आणि त्याच्या पार्टिसिपेटरी नोट्‌स संबंधित गुंतवणूकदारांना देतात.

पी-नोट्‌सचा वापर एक प्रकारे हवाला गैरव्यवहारांसाठी होत असल्याची काही प्रकरणे समोर आल्याने त्यांच्याबाबत काही धोरणे आखण्याचा सरकार विचार करत आहे.