प्रधानमंत्री सूर्य घर योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पीएम सूर्य घर योजना या पानावरून पुनर्निर्देशित)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सूर्य घर योजनेची घोषणा केली. 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ असे योजनेचे नाव आहे. ही रूफटॉप सोलर योजना आहे. ज्यामध्ये ७५,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे.

ही योजना काय आहे जाणून घ्या.

पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील, एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेससारखे कार्य करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल. या योजनेचा तळागाळात प्रचार करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. याशिवाय उत्पन्न वाढवणे, वीज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

मोफत वीज योजना म्हणजे काय?

प्रतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. रुफटॉप सोलरद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती.

पात्रता:

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. तुमच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉप सिस्टम बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. तुम्हाला योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.

सरासरी विजेचा वापर (युनिट) योग्य सौर ऊर्जा प्रणाली क्षमता सबसिडी मदत
० - १५० १ - २ किलोवॅट ₹३०,००० ते ₹६०,०००/-
१५० - ३०० २ - ३ किलोवॅट ₹६०,००० ते ₹७८,०००/-
३०० पेक्षा जास्त ३ किलोवॅट पेक्षा जास्त ₹७८,०००/-

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

[ https://pmsuryaghar.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]