पियाझ्झा देई मिराकोली
Appearance
पियाझ्झा देई मिराकोली ही इटलीच्या टस्कॅनी प्रांतातील येथील पिसा गावातील वास्तु समुह आहे. ८.८७ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या वास्तु युरोपीय मध्ययुगीन कलेचे केंद्र समजले जाते. कॅथॉलिक चर्चच्या मालकीच्या या वास्तु जगातील सर्वोत्तम आर्किटेक्चरल कॉम्प्लेक्सपैकी एक व पवित्र समजल्या जातात. येथील चौकात एकूण चार धार्मिक इमारती आहेत: पिसा कॅथेड्रल, पिसा बाप्टिस्ट्री, कॅम्पनेइल आणि कॅम्पोसेंटो मॉन्मेम्पेल (स्मारकीय कबरी).