पिठापुरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पिठापुरम हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव भारतातल्या ५५ शक्तिपीठांपैकी एक समजले जाते. येथे दत्ताचे देऊळ आहे. दत्ताचा अवतार समजल्या जाणाऱ्या श्रीपाद वल्लभ यांचे हे जन्मस्थळ आहे.

पौराणिक कथा[संपादन]

गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेस होते. तर पाय पिठापुरम येथे होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असेही म्हणतात. संपूर्ण भारत देशात काशी येथे बिंदू-माधव, प्रयाग येथे वेणी-माधव, रामेश्वर येथे सेतु- माधव, त्रिवेंदम येथे सुंदर-माधव तर पिठापुरम येथे कुंती -माधव अशी माधवाची पाच मंदिरे आहेत. पांडव माता कुंतीने जेथे माधवाची पूजा केली, ते हे स्थान.

वाहतूक[संपादन]

रेल्वे मार्ग[संपादन]

हैद्राबाद-विशाखापट्टणमच्या मार्गावरील गाड्या सामलकोट जंक्शनला थांबतात. येथून पिठापुरम अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे.