पाणी पदभार
amount of water used by an individual, community, business, or nation | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | water management | ||
---|---|---|---|
उपवर्ग | use, ecological footprint | ||
| |||
पाणी पदभार (वॉटर फूटप्रिंट) हा एका व्यक्ती, समूह किंवा उद्योगांनी वापरलेल्या वस्तु आणि सेवांच्या उत्पादनात किंवा पुरवठ्यात वापरलेल्या म्हणजेच उपभोगलेल्या पाण्याचे प्रमाण होय. पाणी पदभार हा पाण्याच्या वापराचे प्रमाण दर्शवतो.
पारंपरिकरित्या, पाण्याचा वापर उत्पादनाच्या संदर्भात खालील तीन विभागात केला जातो.
- शेती
- औद्योगिक
- घरगुती
जागतिक पातळीवर पाणी वापरण्यासबंधीत जो काही माहिती आहे तो खूपच मर्यादित आहे.जागतिक शेती आणि कंपन्यांचे औद्योगिक उत्पादन आणि व्यापार यामुळे आभासी पाण्याचा (Virtual Water) जागतिक प्रवाह तयार होत आहे.
२००२ मध्ये पाण्याचा किती वापर केला जातो यासाठी पाण्याचे पदचिन्हे ही संकल्पना आली. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात पाणी वापरण्यासंबंधीत महत्त्वाची माहिती कळू शकेल. १९९० च्या दशकात सुरू झालेल्या पर्यावरणीय पदभार (Environmental Footprint) या संकल्पनेशी वॉटर फुटप्रिंट समरस आहे. कारण पाणी हा पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण घटक आहे.
पाण्याचे पदचिन्हे हा भौगोलिक सूचक फक्त पाण्याचा वापर आणि प्रदूषण दर्शवत नाही तर त्यातील भौगोलिक स्थाने देखील दर्शवतो.
पाण्याचा पदचिन्हाचे प्रकार
[संपादन]निळ्या पाण्याचे पदचिन्हे (Blue Water Footprint)
[संपादन]निळ्या पाण्याचे पदचिन्हे म्हणजे जमिनीवरील किवा भूजल स्रोत (उदा. तलाव, नद्या, जलचर), बाष्पीभवन (उदा. सिंचनाचे पीक घेताना), किंवा उत्पादन घेताना वापरलेले पाणी. सिंचन, शेती, उद्योग आणि घरगुती या ठिकाणी जे पाणी वापरतात तो निळ्या पाण्याचे पदचिन्हे असतो.
हिरव्या पाण्याचे पदचिन्हे ( Green Water Foot print)
[संपादन]हिरव्या पाण्याचे पदचिन्हे म्हणजे जे पाणी झाडाच्या मुळाशी साठले जाते किंवा ज्या पाण्याची झाडांतून वाफ होते, किंवा झाडांनी साठवले जाते त्याला ग्रीन वॉटर फुटप्रिंट असे म्हणतात. हे सर्व शेती, वनीकरण मधील उत्पादनाशी संबंधित आहे.
ग्रे पाण्याचे पदचिन्हे ( Grey Water Foot Print)
[संपादन]पाण्यातले प्रदूषके काढून टाकण्यासाठी आणि ते पाणी मानवी वापरण्यासाठी योग्य बनविण्याकरिता जेवढे पाणी लागते ते म्हणजे ग्रे पाण्याचे पदचिन्हे.(सांडपाणी)
इतिहास
[संपादन]पाण्याचे पदचिन्हाची संकल्पना २००२ मध्ये, नेदयर्लंडच्या ट्वेन्टे विद्यापीठाच्या पाणी व्यवस्थापनाचे प्राध्यापक आणि पाण्याचे पदचिन्हे नेटवर्कचे सह-संस्थापक आणि वैज्ञानिक संचालक "अर्जेन होकेस्त्रा" यांनी मांडली. पाण्याच्या पदभारमुळे वस्तु आणि सेवा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि प्रदूषित होणाऱ्या पाण्याचे मोजमाप करता येते. पाण्याचे पदचिन्हे हा पर्यावरणीय पदभाराच्या कुटुंबातील एक महत्त्वाचा घटक आहे, ज्यामध्ये कार्बन पदभार आणि जमीन पदभार देखील आहेत. वॉटर फुटप्रिंट ही संकल्पना १९९० च्या दशकात "जॉन अॅलन" (स्टोकहोम वॉटर प्राईज, 2008) यांनी सुरू केलेल्या "आभासी पाणी" (Virtual Water) या संकल्पनेशी संबंधित आहे. २००८ मध्ये जागतिक आघाडीच्या संस्थांमधील सहकार्यामुळे पाण्याचे पदचिन्हे नेटवर्कची (WPN) स्थापना झाली. उदा. सारखरेच्या प्रती १ किलो उत्पादनासाठी आपण १५००-२००० लीटर पाणी वापरतो त्या पाण्याला आपण आभासी पाणी असे म्हणतो.
खालील तक्त्यात उत्पादन आणि त्यासाठी वापरले जाणारे पाणी म्हणजेच आभासी पाण्याची उदाहरण दिली आहेत.
उत्पादनचा पाण्याचे पदचिन्हे (कृषी क्षेत्र)
[संपादन]उत्पादनचा पाण्याचे पदचिन्हे म्हणजे उत्पादन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोड्या पाण्याचे एकूण प्रमाण. उत्पादन पाण्याचे पदचिन्हे हा केवळ वापरलेल्या पाण्याचे एकूण प्रमाण दर्शवीत नाही तर हे पाणी कोठे आणि केव्हा वापरले जाते हे पण दर्शविते. जगातील जवळपास ७०% पेक्षा जास्त पाणी शेतीसाठी वापरले जाते.
आहारातील विविधता तसेच मांस सेवनहाराचा सुद्धा पाण्याच्या पदभारात समावेश होतो.
खालील तक्त्यात लोकप्रिय शेती उत्पादनाच्या अंदाजे जागतिक सरासरी पाण्याच्या पदभारांची उदाहरणे दिली आहेत.
कंपन्यांच्या पाण्याचे पदचिन्हे (औद्योगिक क्षेत्र )
[संपादन]व्यवसायांची पाण्याचे पदचिन्हे म्हणजेच कॉर्पोरेट पाण्याचे पदचिन्हे म्हणजे व्यवसाय चालविण्यासाठी प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे स्वरूपात एकूण गोड्या पाण्याचा होणारा वापर. व्यवसायासाठी वापरलेले पाण्याचा संबंध व्यवसायातून उत्पादन केलेल्या मालाचा वापर याच्याशी आहे.
कोको-कोला कंपनी सुमारे २०० देशामध्ये एक हजारांहून अधिक उत्पादन प्रकल्प चालवते. हे पेय बनविण्यासाठी अधिक पाण्याचा वापर होतो. कोको-कोला कंपनीने प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्याची स्थिरता पाहण्यास सुरुवात केली आहे. पाण्याचे पदचिन्हे कमी करण्यासाठी त्यांनी वापरत असलेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे नंतर ते पाणी वातावरणात जाईल तेव्हा ते स्वच्छ असेल.
वैयक्तिक पाण्याचे पदचिन्हे (घरगुती वापर)
[संपादन] वैयक्तिक पाण्याचे पदचिन्हे हा एखाद्या व्यक्तिने एकूण प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष केलेला पाण्याचा वापर. प्रत्यक्ष पाण्याचा वापर म्हणजे घरात वापरलेले पाणी तर अप्रत्यक्ष पाण्याचा वापर म्हणजे एखादी व्यक्ती ज्या काही वस्तु आणि सेवांचा उपभोग घेते त्यांच्या उत्पादनासाठी जे पाणी वापरले जाते ते पाणी.
वर्षकाठी सरासरी जागतिक पाण्याचे पदचिन्हे १३८५ m3 (घनमीटर) इतका असतो. खालील तक्त्या मध्ये विविध देशमधील राहिवाश्यांच्या पाण्याचे पदचिन्हे आहे.
- ^ "Water footprint". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2020-05-28.