पाणीपुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कोरोना च्या काळात भारतातील सगळ्यात जास्त सर्च झालेला पदार्थ म्हणजे पाणीपुरी😋😍 .

पाणीपुरीचा इतिहास[संपादन]

नेमकी तारीख आणि नाव माहीत नाही परंतु या नावीन्यपूर्ण पदार्थामागे दोन कथा आहेत.

१: महाभारतात महाकाव्यात नवविवाहित द्रौपदी तिची सासू कुंती यांच्याकडे घरी परतण्यापूर्वी आली होती. पांडव हद्दपार झाले होते आणि तिची नवीन सून घरात आहे त्या गोष्टीत स्वयंपाक सांभाळेल की नाही, याची कुंतीला काळजी होती. म्हणून तिने द्रौपदीला थोडी उरलेली बटाट्याची भाजी आणि फक्त एक पुरी तयार करण्यासाठी गव्हाचे पीठ दिले व आपल्या पाचही मुलाची भूक भागवण्यासाठी जेवण बनवण्याची सूचना केली. असे मानले जाते की तेव्हा नवीन वधूने द्रौपदीने पाणीपुरीचा शोध लावला. आपल्या सुनेच्या चतुराईने प्रभावित होऊन कुंतीने ह्या पाणीपुरीला अमरत्व दिले.

२. प्राचीन भारतातील १६ महाजनपदां (संस्कृतमधील महान राज्ये) पैकी एक, मगध साम्राज्य आता पश्चिम-मध्य बिहारच्या गंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. असे मानले जाते की फुलकीस (पाणीपुरीचे अग्रदूत) प्रथम या घटनेची सुरूवात मगध येथे झाली जेव्हा या प्रदेशातील अनेक पारंपारिक वैशिष्ठ्ये जसे चिटबा, पिठ्ठो, तिळबा आणि कतरणी तांदळाचा चिवाडा विकसित होत होता. आता ह्या पदार्थांचा शोध लावणारा तर इतिहासाच्या पानांत लुप्त झाला आहे... पण हां.. जो कोणी ह्या पाणीपुरीचा शोध लावलाय हे जर आपल्या भारतीयांना समजले तर प्रत्येक पुरी खाताना त्याचे जन्मभर आभार मानले असते. 🤣😂😂

पाणीपुरीचे विविध नावे[संपादन]

पाणीपुरीला भरपूर नावे आहेत.. जसे राज्य बदलते तसे नाव बदलतात..

पाणीपुरी : महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, नेपाळ

पुचका : बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल

गोलगप्पे : नवी दिल्ली, पंजाब, जम्मूकाश्मीर, हरियाणा, बिहार, हिमाचलप्रदेश

पकोडी : गुजरातमधील काही भाग आणि कच्छ

पाणी के पताशे : हरियाणामधील काही भाग

बताशे : लखनौ

गुपचूप : ओडिशा, हैद्राबाद, दक्षिण झारखंड

फुलकी : उत्तरप्रदेशच्या पूर्व भागात

टिक्की : मध्यप्रदेशातील हुशंगाबादमध्ये

पडका : अलीगड (उत्तरप्रदेश)

चित्रदालन[संपादन]

पाणीपुरी हे अतिशय चवीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे.त्यामध्ये पुरी, चिंचेची चटणी, पुदिना चटणी असते. पाणीपुरीप्रमाणेच शेवपुरीही आवडीने खाल्ली जाते.

अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाणीपुरी आवडीने खातात.हा पदार्थ सर्वत्र सहजपणे मिळतो.फिरायला गेल्यावर लोकांचा हा पदार्थ खाण्याकडे खूप कल असतो.