पाटण, सातारा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाटन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पाटण हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे गाव आहे. पाटण हा सातारा जिल्ह्यातील तालुका आहे, माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण हे देखील याच गावाचे आहेत. पाटण तालुक्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोयना धरण आहे. तालुक्याला सह्याद्रीच्या पर्वत रांगाचा सुंदर चेहरा लाभला आहे. हे सर्व महत्वाचे आहे विजनिर्मती मोठ्या प्रमाणात तयार होते. निसर्गरम्य असे वातावरण या तालुक्यात आहे. गारवडे, बहुले, मारुल, पापर्डे दिवशी अशी काही गावे खूप छान आहेत. मारुल हे गाव खासदार श्रीनिवास पाटील यांचे आहे. या पाच-सहा गावांसाठी कर्मवीर भावराव पाटील यांनी एका टेकडीवर १९४७ मद्ध्ये शाळा सुरु केली होती. या शाळेचे नाव (रयत शिक्षण संस्थेचे) ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी असे आहे. शाळा निसर्गाच्या वातावरणात आहे. शाळेच्या शेजारी विहिरीकेषण हा पाण्याचा मोठा प्रकल्प आहे.ना.बाळासाहेब.देसाई.विद्यालय.कुसरुंड विद्यालय हे रयतेचे आहे.हे विद्यालय कुसरुंड या गावी आहे. या संस्थेने कॉलेज उभारली आहेत. तालुक्यात ओझर्डे गावात धबधबा आहे. तालुक्यात शंभूराजे(शिवसेना) व विक्रमसिह पाटणकर(राष्ट्रवादी) यांचे दोन गट आहेत. मरळी गावात देसाई सह. साखर कारखाना आहे. मरळी हे शंभूराजे यांचे तर पाटण हे पाटणकरांचे गाव आहे ढेबेवाडी गावातील डोंगरावर पवन्च्क्यांचा प्रकल्प आहे. गावा-गावामध्ये सर्व सोई आहेत पाटण हा तालुका खूप छान आणि निसरर्म्य असा आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप असते. श्री. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची जिथे भेट झाली ते चाफळ चे राम मंदिर ठिकाण याच तालुक्यात आहे. महाराष्ट्र सरकार तर्फे जे नवीन महाबळेश्वर होणार आहे ते याच तालुक्यात आहे. पाटण तालुका हा कोयना अभयारण्य साठी हि प्रसिद्ध आहे. पाटण तालुक्यात नाईकबा मंदिर कालभैरव मंदिर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. पाटण हे गाव कोयनेच्या पायथ्याशी वसलेले आहे घेरादातेगड गावाशेजारी घेरादातेगड नावाचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यात तलवारीच्या आकाराचा एक विहीर आहे. पाटण शहरातून कराड - चिपळूण हा मार्ग जातो.