पाटण (सातारा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाटण(सातारा) या पानावरून पुनर्निर्देशित)

पाटण हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे गाव आहे. पाटण हा सातारा जिल्ह्यातील तालुका आहे,महाराष्ट्र राज्यात ज्यांना लोकनेते अस संबोधले जाते ते कै बाळासाहेब देसाई माजी गृहमंत्री, महसूल मंत्री कृषी मंत्री अशी अनेक पद भूषवणारे लोकनेते यांचं देखील हेच गाव, माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण हे देखील याच गावाचे आहेत. पाटण तालुक्यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोयना धरण आहे. तालुक्याला सह्याद्रीच्या पर्वत रांगाचा सुंदर चेहरा लाभला आहे. हे सर्व महत्त्वाचे आहे विजनिर्मती मोठ्या प्रमाणात तयार होते. निसर्गरम्य असे वातावरण या तालुक्यात आहे. कोयना शिक्षण संस्था ही तालुक्यातली प्रमुख शिक्षण संस्था आहे.पाटण तालुका तसा दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले दिसत नाही, बाळासाहेब देसाई साखर कारखाना हा तालुक्यात ल एकमेव मोठा उद्योग म्हणता येईल या पाच-सहा गावांसाठी कर्मवीर भावराव पाटील यांनी एका टेकडीवर १९४७ मद्ध्ये शाळा सुरू केली होती. या शाळेचे नाव (रयत शिक्षण संस्थेचे) ठक्कर बाप्पा विद्यालय गांधी टेकडी असे आहे. शाळा निसर्गाच्या वातावरणात आहे. शाळेच्या शेजारी विहिरीकेषण हा पाण्याचा मोठा प्रकल्प आहे.ना.बाळासाहेब.देसाई.विद्यालय.कुसरुंड विद्यालय हे रयतेचे आहे.हे विद्यालय कुसरुंड या गावी आहे. या संस्थेने कॉलेज उभारली आहेत. तालुक्यात ओझर्डे गावात धबधबा आहे. तालुक्यात शंभूराजे(शिवसेना) व विक्रमसिह पाटणकर(राष्ट्रवादी) यांचे दोन गट आहेत. मरळी गावात लोकनेते बाळासाहेब देसाई सह. साखर कारखाना आहे. मरळी हे शंभूराजे यांचे तर पाटण हे पाटणकरांचे गाव आहे ढेबेवाडी गावातील डोंगरावर पवन्च्क्यांचा प्रकल्प आहे. गावा-गावामध्ये सर्व सोई आहेत पाटण हा तालुका खूप छान आणि निसरर्म्य असा आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप असते. श्री. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांची जिथे भेट झाली ते चाफळचे राम मंदिर ठिकाण याच तालुक्यात आहे. महाराष्ट्र सरकार तर्फे जे नवीन महाबळेश्वर होणार आहे ते याच तालुक्यात आहे. पाटण तालुका हा कोयना अभयारण्य साठी ही प्रसिद्ध आहे. पाटण तालुक्यात नाईकबा मंदिर कालभैरव मंदिर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. पाटण हे गाव कोयनेच्या पायथ्याशी वसलेले आहे घेरादातेगड गावाशेजारी घेरादातेगड नावाचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यात तलवारीच्या आकाराचा एक विहीर आहे. पाटण शहरातून कराड - चिपळूण हा मार्ग जातो.