पाचगाव (चंद्रपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चन्द्रपूर जिल्ह्यातील कोठारी तालुक्यातील पाचगाव सध्या बरेच न्यूज मध्ये आहे. वनहक्क प्राप्त गावातील या ग्रामसभेने एक पूर्णतः वेगळा मार्ग चोखाळून सर्वाना विचार करावयास भाग पाडले.
तेंदू पानाच्या या हंगामात या भागातील बहुदा सर्व गावातील ग्रामस्थ तेंदू पाने तोडून ठेकेदार किंवा अन्य एजन्सीला हि पाने विकून बऱ्या पैकी कमाई करतात. नगदी पैसा मिळविण्यासाठी त्यांना ही एक संधी असते.
या गावाच्या ग्रामसभेने मात्र सर्व सहमतीने निर्णय घेउन तेंदूपाने न तोडण्याचे ठरवले. नगदी पैसे कमाविण्याची एक नामी संधी सोडण्याची कारणे देखील आपणाला विचार करावयास लावणारी आहे. लोकसत्ताने या निर्णयाची नोंद घेतली.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.loksatta.com/pune-news/tribal-village-in-chandrapur-decided-not-to-produce-tendu-leaf-1460524/