पाईट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खेड तालुक्यातील पश्चिमभागात महत्वाचे गाव म्हणून पाईट गावाची ओळख आहे.पाईट हा पश्चिमभागाचा कणा म्हटला जातो पाईट हे गाव विस्तीर्ण स्वरूपाचे असून यामध्ये १२ वाड्या (गवारवाडी,लोढूंगवाडी,चिखलवाडी,पापळवाडी,कोमलवाडी,सावंतवाडी,करंडेवाडी,विठ्ठलवाडी,चोरघेवाडी,रौंधळवाडी,ठाकरवाडी,वैतागवाडी) असुन जागोजागी वस्त्या आहेत त्यात सोपावस्ती,घरकुलवस्ती,करंडेवस्ती,गडदेवस्ती इत्यादींचा सामावेश असून यात २ ग्रामपंचायतीचा सामावेश आहे (पाईट,रौंधळवाडी). गावाच्या उत्तरेस कुंडेश्वर डोंगर असून त्यावर कुंडेश्वर हे क क्षेत्रातील पर्यटन तळ आहे. पाईटगावच्या दक्षिणेला भामा नदी वाहते त्यावर भामाआसखेड हे मोठे धरण आहे त्या धरणाच्या पाण्यामुळे येथीलभाग जलमय व समृद्ध झालेला दिसुन येतो. पाईट गाव हे आठवडे बाजारी गाव असुन पंचक्रोशीतील सर्वात मोठा आठवडे बाजार गुरुवारी पाईट येथे भरतो. पाईट गावाला बाजारपेठेचे स्वरूप प्राप्त झाले आहे, शिवाय गावामध्ये शिक्षणाच्याही सुविधा आहेत इंग्लीश मिडीयम बरोबर जिल्हा परीषदेच्या आदर्श शाळेचाही यात सामावेश आहे, आदिवासी शिक्षण संस्था जुन्नरचे कुंडेश्वर विद्यालय पाईट गावात आहे यात १० वी पर्यंत शिक्षण मिळते.पाईट शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्युनियर कॉलेज मध्ये १२वी पर्यंत शिक्षण घेता येते पाईट गावाची यात्रा ही या भागातील सर्वात मोठी यात्रा भरते.