Jump to content

पलंगका राया

Coordinates: 2°12′36″S 113°55′12″E / 2.21000°S 113.92000°E / -2.21000; 113.92000
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पलंगकराया या पानावरून पुनर्निर्देशित)
पलंगका राया
शहर
कोटा पलंगका राया
डावीकडे वरपासून घड्याळाप्रमाणे:
मध्य कालीमंतान विधानसभा इमारत, अॅक्वेरियस होटेल, कहायान पूल, बुंदारान बुरुंग, सुकर्णो स्मारक, पलंगका राया इस्लामी केन्द्र
Coat of arms of पलंगका राया
मध्य कालीमंतानमध्ये स्थान
गुणक: 2°12′36″S 113°55′12″E / 2.21000°S 113.92000°E / -2.21000; 113.92000
Country इंडोनेशिया ध्वज Indonesia
प्रदेश कालीमंतान
प्रांत मध्य कालीमंतान
स्थापना १७ जुलै, १९५७
सरकार
 • महापौर फैरीद नपारिन
क्षेत्रफळ
 • एकूण २८५३.१२ km (१,१०१.६० sq mi)
Elevation
५ m (१६ ft)
लोकसंख्या
 (२०२२चा अंदाज[])
 • एकूण ३०५९०७
वस्तीविभागणी
एरिया कोड (+६२) ५३६
संकेतस्थळ पलंगकराया.गो.इड

पलंगका राया हे इंडोनेशियाच्या मध्य कालीमंतान प्रांताची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. हे शहर बोर्नियो बेटावर कहायान आणि सबांगाऊ नद्यांच्या मध्ये वसलेले आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या २,९३,५०० होती[] तर २०२०मधील अधिकृत अंदाज ३,०५९०७ होता. यांत १,५५,४९६ पुरुष आणि १,५०,४११ स्त्रीया होत्या. [] पलांगका राया हे इंडोनेशियातील आकाराने सर्वात मोठे शहर आहे (जकार्ताच्या आकाराच्या अंदाजे चार पट). या शहराच्या आसपासचा प्रदेश दाट जंगलाने व्यापलेला आहे. यांतउत्तरेकडील राकुम्पिट आणि बुकिट बटू संरक्षित जंगले, निसर्ग संवर्धन क्षेत्रे आणि टांगकिलिंग जंगलासह). []

पलंगका राया शहरातून वाहणारी कहायन नदी .

पलंगका राया हे नाव दयाक न्गाजू आणि संस्कृत या दोन भाषांतून तयार झाला आहे. दयाक भाषेत पलंगकाचा अर्थ पवित्र स्थान होतो व पलंगका रायाहे विशाल पवित्र स्थळ असल्याचे नावातून सूचित होते. या शहराच्या ठिकाणी पूर्वी दाट जंगलात पहांडुत नावाचे छोटे दयाक गाव होते[] []

डच वसाहतकारांनी काढलेला कालीमंतानचा नकाशा

जंगले आणि पाणी, चिखल आणि खारजमिनीने वेढलेल्या शहरावर नेहमी धुके पडते. याशिवाय जंगलातील वणवे आणि दलदलीतील वायु यांमुळे येथील हवा अनेकदा धूसर होते. [] []

Palangka Raya (Tjilik Riwut Airport, 1991–2020 normals) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 32.3
(90.1)
32.4
(90.3)
32.5
(90.5)
32.3
(90.1)
32.8
(91)
32.5
(90.5)
32.4
(90.3)
32.7
(90.9)
32.8
(91)
32.8
(91)
32.6
(90.7)
32.4
(90.3)
32.54
(90.56)
दैनंदिन °से (°फॅ) 26.8
(80.2)
26.9
(80.4)
27.0
(80.6)
26.9
(80.4)
27.4
(81.3)
27.0
(80.6)
26.7
(80.1)
26.8
(80.2)
27.0
(80.6)
27.1
(80.8)
27.0
(80.6)
26.9
(80.4)
26.96
(80.52)
सरासरी किमान °से (°फॅ) 23.2
(73.8)
23.3
(73.9)
23.4
(74.1)
23.8
(74.8)
23.8
(74.8)
23.3
(73.9)
22.6
(72.7)
22.3
(72.1)
22.7
(72.9)
23.2
(73.8)
23.4
(74.1)
23.3
(73.9)
23.19
(73.73)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 296.2
(11.661)
254.9
(10.035)
332.0
(13.071)
312.0
(12.283)
214.7
(8.453)
166.8
(6.567)
104.4
(4.11)
86.8
(3.417)
117.7
(4.634)
193.9
(7.634)
318.1
(12.524)
320.7
(12.626)
२,७१८.२
(१०७.०१५)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 1.0 mm) 19.9 16.6 19.8 21.3 15.5 13.5 10.6 9.2 10.0 13.4 19.7 21.7 191.2
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 124.2 115.8 128.4 142.3 164.6 141.6 167.6 161.7 140.8 130.0 130.7 126.8 १,६७४.५
स्रोत: World Meteorological Organization[]

वस्तीविभागणी

[संपादन]

पलंगका रायामधील लोकसंख्या वर्षाला २.८४% वेगाने वाढते आहे. येथील लिंग गुणोत्तर १०६ पुरुष प्रति १०० स्त्रीया असे आहे. कालीमंतानमधील इतर भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात स्थलांतरित होत असतात. [१०] [११][१२]

धर्म

[संपादन]

शहरात १,९९,१४० मुस्लिम, ७३,६४१ प्रोटेस्टंट, ५,५११ कॅथलिक, ३,४५३ हिंदू, ४८५ बौद्ध, ८ कन्फ्यूशियन आणि २७ इतर धर्मांचे अनुयायी असल्याचा अंदाज आहे. [१०] [१३] शहरातील अर्ध्याहून अधिक व्यक्ती दयाक वंशाच्या आहेत. याशिवाय बंजार, मलय, बुगिनीज आणि जावानीज यांसारख्या इतर जाती देखील शहरात राहतात. [१४] शहरातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या जेकन राया भागात आहे. [१५]

पलंगक राया नगरगृह
इसेन मुलांग उत्सवातील सुशोभित नाव

२०२०मध्ये २३४ मशिदी, २०४ चर्च, ४ हिंदू मंदिरे आणि ५ चिनी बौद्ध मंदिरे आहेत [१३] [१०] शहरातील सर्वात मोठी मशीद दारुसलाम ग्रँड मस्जिद पलांगका राया आहे. १९८४मध्ये बांधलेली ही मशीद जेकन राया भागात असून ५०,००० मीटर आकाराची असून येथे एकाच वेळी १०,००० लोक नमाज अदा करू शकतात. [१६]

शहरातील चार हिंदू मंदिरांपैकी जसे की पुरा पितामाहा सुद्धा जेकन राया भागात आहे. हे मंदिर १९७८मध्ये इंडोनेशियाच्या सैन्याने स्थानिक हिंदू लोकांच्या मदतीसाठी बांधले होते. याचा वापर बालीहून स्थलांतरित झालेले लोक करतात. [१७] [१८] [१९] [२०]

वाहतूक

[संपादन]

त्जिलिक रिवुत विमानतळ शहराला विमानसेवा पुरवतो. येथे लायन एरचे वैमानिक प्रशिक्षण केन्द्र आहे[२१] [२२] पलंगका रायामध्ये एकूण 911.83 किमी लांबीचे रस्ते आहेत, त्यांपैकी ५६३.७३ किमी डांबरी आहेत. [२२]

पलांगका राया मधील आंतर-प्रांतीय बस स्थानक
पलंगका राया बीआरटी बस बस थांब्यावर

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Badan Pusat Statistik, Jakarta, 2023, Kota Palangkaraya Dalam Angka 2023 (Katalog-BPS 1102001.6271)
  2. ^ "BPS Palangka Raya". 23 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Badan Pusat Statistik, Jakarta, 2021.
  4. ^ "Kabupaten - Kementerian Dalam Negeri - Republik Indonesia". 21 September 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 September 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Profil Palangka Raya" (PDF). 23 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 23 April 2021 रोजी पाहिले.
  6. ^ Febriyana, Wahyu. "Website Kalimantan Tengah". kalteng (इंडोनेशियन भाषेत). 7 June 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2021-06-30 रोजी पाहिले.
  7. ^ "Asap Kalteng Parah". 30 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Kalimantan politicians wear facemasks inside parliament as Palangkaraya suffers in silence". Mongabay Environmental News (इंग्रजी भाषेत). 20 October 2015. 30 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2021 रोजी पाहिले.
  9. ^ "World Meteorological Organization Climate Normals for 1991–2020". World Meteorological Organization. 19 October 2023 रोजी पाहिले.
  10. ^ a b c "BPS Kota Palangka Raya". palangkakota.bps.go.id. 22 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":3" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  11. ^ "BPS Kota Palangka Raya". palangkakota.bps.go.id. 30 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2021 रोजी पाहिले.
  12. ^ RRI 2021, LPP. "Palangka Raya Tertinggi Indeks Pembangunan Manusia di Kalimantan". rri.co.id (इंग्रजी भाषेत). 30 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2021 रोजी पाहिले.
  13. ^ a b "BPS Kota Palangka Raya". palangkakota.bps.go.id. 22 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2021 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":2" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  14. ^ Febriyana, Wahyu. "Keragaman Agama di Kalimantan Tengah". mmckalteng (इंडोनेशियन भाषेत). 30 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 April 2021 रोजी पाहिले.
  15. ^ "Jumlah Penduduk". Pemerintah Kota Palangka Raya (इंडोनेशियन भाषेत). 3 June 2016. 28 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2021 रोजी पाहिले.
  16. ^ "Sistem Informasi Masjid". simas.kemenag.go.id. 27 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2021 रोजी पाहिले.
  17. ^ "Melihat Pura Pitamaha Padma Bhuana yang Menjadi Tempat Persembahyangan Umat Hindu Palangaka Raya, Kalteng". Balipuspanews.com (इंडोनेशियन भाषेत). 3 March 2020. 23 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2021 रोजी पाहिले.
  18. ^ "Pura Pitamaha – Kota Palangkaraya". wikimapia.org (इंडोनेशियन भाषेत). 23 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2021 रोजी पाहिले.
  19. ^ "Sudah Ada Tiga Pura di Kota Cantik". Tribun Kalteng (इंडोनेशियन भाषेत). 23 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2021 रोजी पाहिले.
  20. ^ Home; Terkini; News, Top; Terpopuler; Nusantara; Nasional; Daerah, Kabar; Internasional; Bisnis. "Ratusan Umat Hindu Palangka Raya Ikuti Pawai Ogoh-Ogoh". Antara News Kalteng. 23 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 April 2021 रोजी पाहिले.
  21. ^ Hakim, Abdul Djalil (15 February 2013). "Lion Air Bangun Sekolah Pilot di Palangkaraya". Tempo. 11 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 April 2019 रोजी पाहिले.
  22. ^ a b "Badan Pusat Statistik Provinsi Kalimantan Tengah". kalteng.bps.go.id. 22 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 April 2021 रोजी पाहिले.

साचा:मध्य कालीमंतान