पदवीधर मतदारसंघ
आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेप्रमाणेच विधानपरिषद अस्तित्वात आहे. ज्यांचे आमदार हे नगरसेवक, जिल्हापरिषद/पंचायत समिती सदस्यांमधून, आमदारांमधून, शिक्षकांमधून आणि पदवीधरांमधून निवडून जातात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना लोकशाहीप्रक्रियेत स्थान मिळावे, अशी त्यात कल्पना आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील पदवीधर त्या त्या भागातून त्यांचा प्रतिनिधी आमदार म्हणून निवडून पाठवतात.
पदवीधरांचा मतदारसंघ असतो, ही गोष्ट खेडेगावातील मतदारांना जास्त प्रमाणात प्रचलित नाही, याचा प्रसार करणं ही एक महत्त्वाची व काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्हा/विभाग याचा पदवीधर मतदारसंघ असतो. त्या मतदारसंघातून पदवीधारक निवडणुकीसाठी पात्र असतो. सर्व नोंदणीकृत पदवीधारक मतदार पदवीधर उमेदवारास मतदान करतात. त्यास निवडून देतात तो त्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधारकांचे प्रश्न सोडवतो. तो विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम करतो.