पथनाट्य एक रंगमंच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विक्रम फलटणकर यांनी मुंबईत पथनाट्य नावाच्या एका रंगमंचाची २६ नोव्हेंबर २०१७ रोजी स्थापन केली

पथनाट्य एक रंगमंच[संपादन]

विक्रम फलटणकर हे पथनाट्य करत असताना त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की पथनाट्य किंवा स्ट्रीट प्ले हा नाटकाचा एक महत्त्वाचा प्रकार असायला हवा. पथनाट्य हे

write side umesh pachare rupali gore vikas faltankar akansha podar vikram faltankar vijay gore roshan jadhav charu poddar
डाव्या बाजू ने  उमेश पाचारे रुपाली गोरे विकास फलटणकर आकांशा पोद्दार विक्रम फलटणकर विजय गोरे रोशन जाधव आणि सामोरे चारू पोद्दार

रस्त्यावर किंवा चौकाचौकांत चालत असले तरी,आज रस्त्यावर चालणाऱ्या गारुड्याच्या किंवा डोंबाऱ्याच्या खेळांना कुणी पथनाट्य म्हणत नाही. पथनाट्य हा निव्वळ करमणुकीचा प्रकार नाही ते निर्हेतुक नसते. विशिष्ट सामाजिक वा राजकीय विचार जनमानसात पोचवण्याचे काम ही पथनाट्ये करत असतात.ती एक सामाजिक चळवळ आहे. विशिष्ट विचारसरणी असलेले कलाकार आपल्या अभिनयाद्वारे त्यांचा विचार पसरवण्याचे काम अशा नाटकांद्वारे करत असतात. रस्त्यावर चालणाऱ्या मोर्चा, घेराव, जाहीर सभा यांपेक्षा पथनाट्य वेगळे आहे. आर्थिक-सामाजिक विषमता, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांची दडपशाही, सरकारची अकार्यक्षमता, नोकरशाहीची चालढकलवृत्ती, धार्मिकतेचे स्तोम, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा प्रश्न आदी अनेक विषयांवर ही पथनाट्ये भाष्य करून रस्त्यावरील प्रेक्षकांमध्ये जागृतीचे काम करीत असतात. पथनाट्याच्या कलावंतांना उंच स्वरात बोलावे लागते. त्यांचा सारा भर अभिनयापेक्षा प्रेक्षकांना प्रश्नाची जाणीव करून देण्यात असतो. आपल्या आकर्षक आणि चटकदार संवादांतून रस्त्यावरील प्रेक्षकांना जखडून कसे ठेवायचे यातच त्या कलावंतांचा सगळा प्रयत्‍न असतो.आणि अभिनयाचा हा एक उत्तम मार्ग पण आहे.

विक्रम फलटणकर यांच्या संस्थेने साडेचार हजाराहून अधिक पथनाट्ये सादर केली आहेत

याच संस्थेकडून

 • स्टेज शो
 • नाटके
 • लघुचित्रपट
 • ऑर्केस्ट्रा
 • कव्वालीचे कार्यक्रम
 • पारंपरिक जागरण गोंधळ
 • स्टॅण्डअप कॉमेडी
 • अभिनय कसा करावा
 • फोटोग्राफिक

इत्यादी कार्यक्रम होत असतात. संस्थेच्या माध्यमातून लेखन, अभिनय, नृत्य, तसेच गीतगायन याचे ऑफ़लाईन व ऑनलाईन क्लासेस घेतले जातात

पथनाट्य एक रंगमंच कार्यकारी मंडळ[संपादन]

 • संस्थापक : विक्रम संतोष फलटणकर
 • अध्यक्ष : विकास दिगंबर फलटणकर
 • उपाध्यक्ष : उमेश रामनाथ पाचारे
 • वरिष्ठ सचिव : दिलीप कृष्णदेव सोनवणे / रोशन जयवंत जाधव
 • सचिव : आकांशा पोद्दार / प्रथमेश सुरेश जगताप
 • सदस्य : स्नेहा गायकवाड, स्नेहल खानोलकर, आकांशा पोद्दार, बबन पवार, विजय गोरे,अविनाश सुरडकर, वगैरे वगैरे.


कविता[संपादन]

 • म्हणे देशातना मर्द जन्मले
 • लाख चांदण्यांची होती एक रात्र
 • पुन्हा वाटते की तुला आठवावे
 • तू आलीस माझ्या मिठीत
 • माझे बाबा
 • आई
 • आर्थिक कष्ट
 • इत्यादी

नाटके[संपादन]

 • बोंबा मारी शेंबड
 • बलात्कार
 • श्रद्धा की अंधश्रद्धा
 • फक्त बाप
 • इत्यादी

लघुचित्रपट[संपादन]

विक्रम फलटणकर यांनी लिहिलेल्या दोन पक्षी एक कथा' या लघु चित्रपटाची निर्मिती पथनाट्य एक रंगमंचने  केली होती पण काही तांत्रिक कारणांमुळे हा लघुचित्रपट लोकप्रिय झाला नाही, याची खंत त्यांच्या टीमच्या मनाला लागली

 • मी शिकणार आहे
 • माझी रात्र शाळा
 • अस्तित्व राखेच
 • दोन पक्षी एक कथा
 • एक प्रवास असाही
 • प्रेम कि यातना
 • इत्यादी

गीत[संपादन]

आपला देश हा धर्म निरपेक्ष आहे  तरीही काही लोक जाती पती आणि धर्मचा आढावा घेऊन एकमेकांना छळतात. याला कारण असे की शिक्षणापासून वंचित असल्यामुळे, पथनाट्याच्या गीतांच्या माध्यमातून लोकांनी शिक्षण घेतल पाहिजे यावर भर दिला. त्यांचे चलो रे चालो साथी  हे गीत  आजही प्रसिद्ध आहे

 • ना जातीना पाती ना धर्म पाहिजे
 • तू तंभाकू सोड रं …
 • चालो रे चालो साथी
 • आवड ज्याची तू त्यालाच खाल
 • जन्मा आधी मुरली झाले
 • जो तुझं प्रेम घेईल त्याचा विकास होईल
 • इत्यादी

पारंपरिक जागरण गोंधळ[संपादन]

महाराष्ट्रात गोंधळी लोक गोंधळ हे पारंपरिक/ विधिनाट्य सादर करतात. या जातीचे लोक महाराष्‍ट्र, कर्नाटक, मध्‍यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या प्रांतांत विशेषेकरून आढळतात. गोंधळ्यांनी आपल्‍या विधिनाट्याची एक स्‍वतंत्र रंगभूमी विकसित केली असून आपल्‍या या रंगभूमीवरील रंगाविष्‍काराला संस्‍थात्‍मक स्‍वरूप प्राप्‍त करून दिले आहे. विक्रम फलटणकर यांचे काका स्वर्गवासी दिगंबर संपत फलटणकर हे पारंपरिक जागरण गोंधळ करीत असत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने विकास दिगंबर फलटणकर व विक्रम संतोष फलटणकर यांनी ही परंपरा पुढे तशीच चालू ठेवली स्वर्गवासी गुरुवर्य डफसम्राट श्री पोपट बाबुराव केदारे यांचे शिष्य श्री जनार्दन गंगाराम बाविस्कर यांच्या बरोबरीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय तर इतर राज्यांत देखील पारंपरिक जागरण गोंधळाचे कार्यक्रम केले आहेत व  करत आहेत .