पक्ष्याचे अंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर्वच पक्ष्यांची मादी अंडी घालते आणि पक्ष्यांची पिले अंड्यातून जन्माला येतात. पक्ष्याला संस्कृतमधे द्विज असा शब्द आहे. अंडे हा पक्ष्याचा पहिला जन्म तर अंड्यातून पिलू बाहेर येते तो दुसरा जन्म. पक्ष्यांच्या प्रजातीनुसार अंड्याचा आकार, बाह्य रूप, रंग, वजन, उबवण्यासाठी लागणारा काळ, एका वीणीच्या काळात घातलेली अंड्यांची एकूण संख्या इत्यादी गोष्टीत खूप विविधता आढळते. पक्ष्यांच्या अंड्यांच्या शास्त्रीय अभ्यासास 'ऊलॉजी' (Oology) असे म्हणतात.