पंचचामर (वृत्त)
Appearance
पंचचामर / पञ्चचामर हे एका ओळीत सोळा अक्षरे असणारे अक्षरगणवृत्त आहे.[१] ह्या वृत्तात दर आठ अक्षरानंतर यती (विराम) येते.
याचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :
ल गा ल गा | ल गा ल गा | ल गा ल गा | ल गा ल गा |
---|---|---|---|
१ २ १ २ | १ २ १ २ | १ २ १ २ | १ २ १ २ |
उदाहरण
[संपादन]- जरौ जरौ ततो जगौच पञ्चचामरं वदेत् ।
- जनास राधिका जनास राधिका जनास गा ।
जनास राधिका जनास राधिका जनास गा ॥
- रावणविरचित शिवतांडवस्तोत्र हे काव्य पञ्चचामर वृत्तात बांधलेले आहे.
जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी ।
विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि ॥
धगद्धगद्धगज्ज्वल ल्ललाटपट्टपावके ।
किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम ॥