पंचकल्याणक महोत्सव
Appearance
पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा तीर्थकर भगवानाच्या गर्भात असल्यापासून मोक्षापर्यंत जाण्याच्या विधीसंबंधीचा अतिशय महत्त्वाचा जैन सण आहे. हे पाच कल्याणक दिगंबर जैनांचे तीर्थकरांच्या पुण्य प्रकृतीच्या उदयापासून होतात. कल्याणक याप्रमाणे आहेत. :
१. गर्भ कल्याणक २. जन्म कल्याणक ३. तप कल्याणक ४. ज्ञान कल्याणक ५ मोक्ष कल्याणक. या कल्याणकांचे अनुकरण करून जैन लोक दर वर्षी अनेक ठिकाणी पंचकल्याणक महोत्सव साजरा करतात. या महोत्सवांत लाखो जैन आणि गैरजैन उपस्थित राहतात, आणि विविध धाार्मिक आयोजनोंबरोबर नवीन मूर्ती स्थापन करून त्यांची पूजा करतात.