Jump to content

डॉइचलांड वर्गाची क्रुझर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पँझरशिफ या पानावरून पुनर्निर्देशित)
डॉइचलांडचे जलावतरण

डॉइचलांड वर्गाची क्रुझर किंवा पॉकेट बॅटलशिप (जर्मन भाषा:पॅंझरशिफ) ही जर्मनीने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस बांधलेल्या तीन चिलखती क्रुझरा होत्या. व्हर्सायच्या तहातील कलमानुसार जर्मनीला १०,००० लॉंगटनांपेक्षा जास्त वजन असलेल्या मोठ्या युद्धनौका बांधण्यास अटकाव होता म्हणून युद्धनौकेसारख्याच त्याहून हलक्या तरी तहानुसार जास्तीतजास्त वजन असू शकणाऱ्या या लढाऊ नौका १०,६०० ते १२,३४० लॉंगटनाच्या होत्या.

डॉइचलांड, ॲडमिरल ग्राफ स्पी, आणि ॲडमिरल शीयर अशी नावे असलेल्या या जहाजांमध्ये वजनाची बचत करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरलेल्या होत्या. यांच्या बांधणीत वेल्डिंग[मराठी शब्द सुचवा]चा वापर केलेला होता तसेच यांची इंजिने पूर्णपणे डीझेलवर चालणारी होती. या नौकांवर ११ इंच व्यासाचे गोळे फेकू शकणाऱ्या प्रत्येकी सहा तोफा होत्या. यामुळे त्यांना छोट्या युद्धनौका (पॉकेट बॅटलशिप) असेही नामाभिधान मिळाले.