न्युर्नबर्ग कायदे
Appearance
हा लेख नाझी जर्मनीने मंजूर केलेले काही ज्यूविरोधी कायदे याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, न्युर्नबर्ग (नि:संदिग्धीकरण).
न्युर्नबर्ग कायदे (जर्मन: Nürnberger Gesetze) हे इ.स. १९३५ साली नाझी पक्षाच्या राजवटीखाली नाझी जर्मनीने मंजूर केलेले काही ज्यूविरोधी कायदे होते. हे कायदे नाझी पक्षाच्या न्युर्नबर्ग ह्या शहरामधील मोठ्या वार्षिक मेळाव्यादरम्यान जाहीर करण्यात आले. नाझी पक्षाच्या उघड ज्यूविरोधी धोरणांवर ह्या कायद्यांमुळे अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
ह्या कायद्यानुसार सर्व आजी-आजोबा जर्मन वंशाचे असलेली व्यक्ती जर्मन तर तीन किंवा चार आजी-आजोबा ज्यू असलेली व्यक्ती ज्यू धर्मीय मानली जात असे. जर्मनेतर सर्व लोकांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित करण्यात आले. तसेच ह्या कायद्यातून सर्व ज्यू लोकांचे जर्मन नागरिकत्व रद्द करण्यात आले.
कायदे
[संपादन](15 September 1935)
- भाग १
- ज्यू व जर्मन व्यक्तींचा विवाह बेकायदेशीर.
- सरकारी वकीलातर्फे हे विवाह रद्द करण्याची तरतूद
- भाग २
- ज्यू व जर्मन व्यक्तींना लैंगिक संबंध ठेवण्यास मज्जाव
- भाग ३
- जर्मन वंशाच्या ४५ पेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तींना नोकर म्हणून ठेवण्यास ज्यूंना मज्जाव
- भाग ४
- नाझी जर्मनी किंवा राईशचा ध्वज अथवा कोणतेही सरकारी चिन्ह बाळगण्यास/दाखवण्यास ज्यूंना बंदी
- ज्युईश रंग बाळगण्यास ज्यूंना परवानगी
- भाग ५
- भाग १ मधील कायदा मोडणाऱ्यास सक्तमजूरीची शिक्षा.
- भाग २ मधील कायदा मोडणाऱ्यास तुरुंगवास अथवा सक्तमजूरीची शिक्षा.
- भाग ३ व ४ मधील कायदा मोडणाऱ्यास एक वर्षाचा तुरुंगवास व दंड.
बाह्य दुवे
[संपादन]- संपूर्ण कायदा Archived 2009-04-09 at the Wayback Machine. (इंग्रजी)