Jump to content

नोम (अलास्का)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नोम
अमेरिकेतील शहर
स्थापना1898 संपादन
अधिकृत नावNome संपादन
मूळ लेबलSitŋasuaq संपादन
देशअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानNome Census Area संपादन
भौगोलिक गुणक६४°३०′०″N १६५°२४′०″W संपादन
महत्वाची घटनाcity fire संपादन
डाक संकेतांक99762 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.nomealaska.org संपादन
Köppen climate classificationwet continental climate संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड907 संपादन
Map

नोम तथा सिटनासाक अमेरिकेच्या अलास्का राज्यातील मोठे शहर आहे. नोम बेरिंग समुद्राच्या नॉर्टन अखातावरील सीवार्ड द्वीपकल्पावर वसलेले आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ३,५९८ होती.

इतिहास

[संपादन]
नोम, १९००
१९०७ पर्यंत तंबूंच्या जागी घरे उभारली गेली होती.

सुवर्णशोधापूर्वीचा काळ

[संपादन]

प्रागैतिहासिक काळापासून इनुपियाट जमातीचे लोक अलास्कियाच्या पश्चिम किनाऱ्यावर शिकारीसाठी येत असत. सोन्याचा शोध लागण्यापूर्वी नोम येथे 'सितनासुक' (Sitnasuak) नावाने ओळखली जाणारी इनुपियाट लोकांची एक वस्ती अस्तित्वात असल्याचे दर्शवणारे पुरातत्वीय पुरावे नुकतेच मिळाले आहेत.

सुवर्णशोध (गोल्ड रश)

[संपादन]
मुख्य लेख: नोम गोल्ड रश
१९०७ च्या सुमारासचे नोममधील रस्त्याचे दृश्य

इडिटारोड शर्यत

[संपादन]
मुख्य लेख: १९२५ सीरम रन
नोममध्ये समाप्त होणारीइडिटारॉड ट्रेल स्लेड कुत्र्यांची शर्यत १९२५ सीरम रनच्या आठवणी प्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित केली जाते.

१९२५ मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कुत्र्यांच्या स्लेड गाड्यांनी डीप्थेरिया प्रतिविष (सीरम) पोहोचवून शेकडो जीव वाचवले होते. अनेक स्लेड चालक आणि त्यांच्या इमानदार कुत्र्यांनी हिमवादळे गोढवून टाकणारी थंडी, पर्वतराजी, गोठलेले तलाव आणि उपासमारीचा सामना करीत घटसर्पविरोधी लस जीवाची शर्थ करून अँकोरेजपासून नोमला पोचवली होती.

या शर्यतीतील शेवटच्या टप्प्याचा स्लेड चालक नॉर्वेजियन वंशाचा गुन्नार कासेन होता. त्याची स्लेड ओढणाऱ्या कुत्र्यांचा नेता बाल्टो नावाचा कुत्रा होता. त्याने अंधार, थंडी आणि दिशाहीनतेतून आपला मालक, त्याचे साथी कुत्रे आणि सीरम वेळेत नोमला पोचलवे होते. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ न्यू यॉर्क शहरातील सेंट्रल पार्क येथील सेंट्रल पार्क झू जवळ एफ.जी. रॉथ यांनी बनवलेला पुतळा उभा आहे. लिओनहार्ड सेप्पाला याने १९२५ च्या सीरम रनचा सर्वात मोठा उपउपांत्य टप्पा पार केला होता. त्याच्या कुत्र्यांपैकी एक असलेला टोगो याला या धावेचा विस्मृत नायक मानले जाते.[१] त्याच्या स्लेड पथकातील फ्रिट्झ नावाच्या कुत्र्याचे कलेवर नोममधील कॅरी एम. मॅकलेन मेमोरियल म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९७३ मध्ये इडिटारॉड स्लेड शर्यत सुरू करण्यात आली. १,०४९ पेक्षा अधिक मैल (१,६०० किमी) लांबीची ही शर्यत मानवी आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यांच्या काटकपणाचा शर्थ बघते. या शर्यतीचे शेवटचे काही टप्पे १९२५ च्या सीरम रनच्या रस्त्यावरून जातात.

अर्थव्यवस्था

[संपादन]
ऑक्टोबर २०१८ मध्ये यू.एस. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये अलास्काचे प्रतिनिधी डॉन यंग यांच्यासोबत बैठक करताना नोम चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य
ऑक्टोबर २०१८ मध्ये यू.एस. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमध्ये अलास्काचे प्रतिनिधी डॉन यंग यांच्यासोबत बैठक करताना नोम चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य
नोममधील सोन्याचे उत्खनन, १९४० चे दशक
नोममधील सोन्याचे उत्खनन, १९४० चे दशक

सोन्याचे खाणकाम हा सुरुवातीपासून आजतागायत नोमच्या लोकांसाठी रोजगार आणि महसुलाचा एक प्रमुख स्रोत राहिला आहे. १९९० मध्ये शहराच्या अर्थव्यवस्थेतील खाणकामाचे योगदान वर्षाला ६० लक्ष डॉलर मूल्याचे असल्याचा अंदाज होता. त्यानंतर सोन्याच्या किंमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सागरी पट्ट्यांमधील (ऑफशोर) भाडेतत्त्वावरील क्षेत्रांमध्ये पुन्हा रस निर्माण झाला. तेथे अंदाजे १०,०००,००० औंस (सुमारे २८,३०० किलोग्रॅम) सोन्याचा साठा राखीव असल्याचा अंदाज आहे.[२] या कामाद्वारे येथील महसूल आणि रोजगारात मोठी वाढ झाली.[३]

वाहतूक

[संपादन]
नोम विमानतळ

विमानतळ

[संपादन]

नोम हे आसपासच्या खेड्यांसाठी वाहतुकीचे प्रादेशिक केंद्र आहे. येथे राज्य सरकारच्या मालकीचे दोन विमानतळ आहेत:

  • नोम विमानतळ – नोमच्या मध्यवर्ती भागाच्या पश्चिमेस दोन सागरी मैल (३.७ किमी) अंतरावर असलेला सार्वजनिक वापराचा विमानतळ. यात डांबरीकरण केलेल्या दोन धावपट्ट्या आहेत: ३/२१ धावपट्टी ५,५७६ × १५० फूट (१,७०० × ४६ मी) आणि १०/२८ धावपट्टी ६,००१ × १५० फूट (१,८२९ × ४६ मी) आकाराची आहे. विमानतळ सुधारणीचा ८.५ दशलक्ष डॉलरचा प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
  • नोम सिटी फील्ड – नोमच्या मध्यवर्ती भागाच्या उत्तरेस एक सागरी मैल (१.८५ किमी) अंतरावर असलेले सार्वजनिक वापराचा विमानतळ. यात १९५० फूट लांबीची खडकाची (ग्रेव्हल) पृष्ठभाग असलेली ३/२१ नावाची एकच धावपट्टी आहे. याचा वापर खाजगी विमान वाहतुकीसाठी]] केला जातो.

निवडक प्रसिद्ध व्यक्ती

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "Togo Sled Dog Overlooked by History". Turtlezen.com. December 5, 1929. February 28, 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 23, 2013 रोजी पाहिले.
  2. ↑ "Nome Offshore Placer deposits (ARDF #NM253) Au". mrdata.usgs.gov. January 27, 2019 रोजी पाहिले.
  3. ↑ Stinson, Holly (1991). "Nome: Gold & Government Rule the Economy" (PDF). Alaska Department of Labor. December 22, 2016 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. January 27, 2019 रोजी पाहिले.
  4. ↑ "Carrie McLain Papers". vilda.alaska.edu (इंग्रजी भाषेत). June 1, 2023 रोजी पाहिले.